खराब डाएटमुळे होतो 'या' जीवघेण्या आजाराचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 01:27 PM2019-05-24T13:27:52+5:302019-05-24T13:30:35+5:30

सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये कोणालाच स्वतःकडे लक्ष देणं शक्य होत नाही. अशातच अनेक गोष्टींचा धोका वाढतो. धकाधकीची जीवनशैली आणि असंतुलित आहार यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो.

Poor diet can increase the risk of cancer claims a new study | खराब डाएटमुळे होतो 'या' जीवघेण्या आजाराचा धोका!

खराब डाएटमुळे होतो 'या' जीवघेण्या आजाराचा धोका!

Next

सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये कोणालाच स्वतःकडे लक्ष देणं शक्य होत नाही. अशातच अनेक गोष्टींचा धोका वाढतो. धकाधकीची जीवनशैली आणि असंतुलित आहार यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे याबाबत योग्य वेळीच सावध होणं आवश्यक असतं. संतुलित लाइफस्टाइल आणि हेल्दी डाएटचं सेवन करणं आवश्यक आहे. कॅन्सर फक्त आनुवंशिकतेमुळे, प्रदूषित वातावरणामुळे किंवा खराब लाइफस्टाइलमुळे होत नाही, तर खराब डाएटमुळेही कॅन्सर होण्याचा धोका बळावतो. 

काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून दाव करण्यात आला आहे की, खरब डाएटमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. जेएनसीआय कॅन्सर स्पॅक्ट्रममध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, 2015मध्ये अमेरिकेतील 80 हजारपेक्षा जास्त कॅन्सरचे नवीन रूग्ण समोर आले आहेत. ज्यांमध्ये मुख्य कारण खराब डाएट आहे. या संशोधनासाठी संशोधनकर्त्यांनी सात डाएटमध्ये समाविष्ट होणाऱ्या पदार्थांचे आकलन केले आहे. यामध्ये अनेक लोक फळं, भाज्या, धान्य, भाज्या, आणि दूध यांसारख्या पदार्थांचं कमी प्रमाणात सेवन आणि प्रोसेस्ड मीट, रेड मीट आणि सोडा यांसारख्या शुगरचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचे अत्याधिक सेवन करत असल्याचे आढळून आले. 

या सर्व गोष्टींचे आकलन केल्यानंतर परिणाम समोर आले की, धान्यांचे कमी प्रमाणात सेवन केल्यामुळे अमेरिकेमध्ये कॅन्सरचे सर्वात जास्त प्रकरणं दिसून आली. या संशोधनामध्ये 2013 ते 2016मध्ये अमेरिकेमध्ये वयस्क व्यक्तींच्या डेली डाएटसंदर्भातील आकड्यांचे आकलन करण्यात आले. हा डेटा नॅशनल हेल्थ अॅन्ड न्यूट्रिशन एग्जामिनेशन सर्वेमधून प्राप्त करण्यात आला होता. त्याचबरोबर या सर्वेसाठी 2015मध्ये यूएस सेंटर्स फॉर कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशनपासून नॅशनल कॅन्सरच्या घटनाबाबत डेटाचाही समावेश करण्यात आला होता. 

संशोधनाच्या लेखिका टफ्ट्स यूनिवर्सिटीच्या कॅन्सर विशेषज्ञ झँगच्या अनुसार, मागील संशोधनांमध्ये काही उलट परिणाम दिसून आले होत. मागील संशोधनांमध्ये प्रोसस्ड मीटचे जास्त सेवन केल्याने कोलन कॅन्सरचा धोका जास्त असतो. पण तेच जर कडधान्य आणि धान्यांचा आहारात समावेश केला तर हा धोका कमी होतो. संशोधकांना या संशोधनातून असं आढळून आलं की, कोलोन आणि रॅक्टल कॅन्सरमध्ये डाएट संदर्भातील प्रकरणांची संख्या आणि सरासरी 38.3 टक्के होता. जर डाएटला मुख्य बिंदु करून जर त्या परिणामांचे पुनरावलोकन करण्यात आले तेव्हा असं सिद्ध झालं की, धान्या आणि दूधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे कमी सेवन आणि प्रोसेस्ड मीट प्रॉडक्ट्सच्या अत्याधिक सेवनाने कॅन्सरचा धोका वाढतो. दरम्यान या संशोधनात काही गोष्टींची कमतरताही आढळून येते. हे संशोधन या गोष्टीवर प्रकाश टाकत नाही की, वाढत्या वयानुसार, डाएट आणि कॅन्सरच्या  धोक्यामध्ये कसा बदल घडून येतो आणि येत असेल तरी कितपत? 

टिप : वरील सर्व गोष्टी केवळ संशोधनातून सिद्ध झालेल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

Web Title: Poor diet can increase the risk of cancer claims a new study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.