काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी बिनधास्त पिझ्झा खा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:14 PM2019-03-18T15:14:41+5:302019-03-18T15:15:40+5:30

ऑफिसमध्ये सतत काम केल्याने मन आणि शरीर दोन्ही थकतं. ज्यामळे तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. पुन्हा तुमची काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असते.

Pizza eating boost your productivity levels says research | काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी बिनधास्त पिझ्झा खा!

काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी बिनधास्त पिझ्झा खा!

Next

ऑफिसमध्ये सतत काम केल्याने मन आणि शरीर दोन्ही थकतं. ज्यामळे तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. पुन्हा तुमची काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असते. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, स्वादिष्ट आणि चांगलं जेवण काम करण्याची क्षमता उत्तम करण्यासाठी प्रोत्साहित करतं, तर हे तंतोतंत खरं आहे. जेव्हा चविष्ट पदार्थांबाबत बोललं जातं त्यावेळी पिझ्झाचं नाव आलं नाही असं होणं शक्यच नाही. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की, पिझ्झामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅलरी असतात. ज्या आरोग्यासाठी घातक असतात. परंतु, हे सर्व माहीत असूनही अनेक लोक पिझ्झा खाण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. आता तर तुम्हाला पिझ्झा खाण्यासाठी आणखी एक कारण मिळालं आहे. याआधी करण्यात आलेल्या अनेक संशोधनांमधून पिझ्झा हे जंक फूड असून त्याच्या सेवनाने आरोग्यावर अनेक हानिकारक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनामधून पिझ्झा खाल्याने आपल्या काम करण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होते असं सिद्ध झाले आहे. 

संशोधन 

अमेरिकेतील एका सायकोलॉजिस्टला कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता जाणून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी एका फॅक्ट्रिमध्ये आपलं हे संशोधन करण्याचा निर्णय घेतला. फॅक्ट्रिमधील कर्मचाऱ्यांना चांगलं काम केल्यानंतर तीन प्रकारे इन्सेटिव्ह देण्याची ऑफर देण्यात आली. ज्यामध्ये फ्री पिझ्झा, बोनस क्लेम (मनी) आणि बॉसकडून प्रशंसा यांसारख्या गोष्टींचा समावेश केला.  यानंतर अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी फ्री पिझ्झाची ऑफर स्विकारली. याव्यतिरिक्त काही लोकांनी बोनस आणि प्रशंसा यांसारख्या ऑफर स्विकारल्या. 

निष्कर्ष

एका आठवड्यानंतर जेव्हा कर्मचाऱ्यांच्या कामाची तुलना करण्यात आली, त्यावेळी असं दिसून आलं की, ज्या लोकांनी पिझ्झा खाण्याची ऑफर स्विकारली होती, त्या लोकांची काम करण्याच्या क्षमतेमध्ये 6.7 टक्क्यांनी वाढ झाली होती. ज्या लोकांनी बॉसकडून मिळणाऱ्या प्रशंसेची ऑफर स्विकारली होती, त्यां लोकांच्या कामामध्ये 6.6 टक्क्यांनी वाढ झाली होती. तेच ज्या लोकांनी ऑफरमध्ये बोनस घेतला होता. त्या लोकांच्या काम करण्याची क्षमता 13 टक्क्यांनी कमी झाली होती. 

संशोधनातून समोर आलं की, पैसे जास्त दिवसांपर्यंत तुम्हाला प्रोत्साहित करू शकत नाहीत. परंतु खाणं लोकांना जास्त वेळ प्रोत्साहित करतं. खाणं आणि कामाची तारिफ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये मदत करते. जर तुम्हालाही तुमच्या कामाची क्षमता वाढवायची असेल तर पिझ्झा खाऊ शकता.

टिप : वरील बाबी संशोधनामधून सिद्ध झाल्या असून आम्ही या गोष्टींचा दाव करत नाही. 

Web Title: Pizza eating boost your productivity levels says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.