चिमूटभर हिंगाचे अनेक आहेत फायदे; दूर होतील अनेक समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 01:57 PM2019-03-19T13:57:36+5:302019-03-19T13:58:39+5:30

फोडणीमध्ये चिमूटभर वापरण्यात येणारा हिंग अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरतो. हिंगामध्ये अनेक न्यूट्रिएंट्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पारंपारिक मसाल्याच्या पदार्थांमध्ये सामाविष्ट होणारा हिंग, पारंपारिक चवीसाठी ओळखला जातो.

Pinch of Asafoetida or Hinga gives plenty of health benefits | चिमूटभर हिंगाचे अनेक आहेत फायदे; दूर होतील अनेक समस्या!

चिमूटभर हिंगाचे अनेक आहेत फायदे; दूर होतील अनेक समस्या!

googlenewsNext

(Image Credit : parenting.firstcry.com)

फोडणीमध्ये चिमूटभर वापरण्यात येणारा हिंग अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरतो. हिंगामध्ये अनेक न्यूट्रिएंट्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पारंपारिक मसाल्याच्या पदार्थांमध्ये सामाविष्ट होणारा हिंग, पारंपारिक चवीसाठी ओळखला जातो. भारतीय पदार्थ हिंगाशिवाय अपूर्णच असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? पदार्थांची चव वाढविणारा हिंग. आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो.  

दातांसाठी उपयोगी

जर तुमच्या दातांमध्ये वेदना होत असतील तर हे नक्की की, एखादा बॅक्टेरिया तुमच्या दातांना त्रास देत आहे. हिंगामध्ये अनेक अ‍ॅन्टीबॅक्टेरियल तत्व आढळून येतात. जे दातांना लागलेली किड दूर करण्यासाठी मदत करतात. एवढचं नव्हे तर दातांच्या वेदना दूर करण्यासाठीही हिग परिणामकारक ठरतो. जर तुमचे दात दुखत असतील तर एक हिंगाचा तुकडा त्या दाताखाली ठेवा. त्यामुळे दाताचं दुखणं कमी होइल. 

उत्तम माउथ वॉश

अ‍ॅन्टीबॅक्टेरियल तत्व असलेल्या हिंगाचा वापर तुम्ही माउथ वॉश म्हणूनही करू शकता. माउथ वॉश करण्यासाठी एक कप पाण्यामध्ये हिंग आणि काही लवंग एकत्र करा. पाणी कोमट गरम करून या पाण्याचा वापर माउथ वॉश म्हणून करा. तोंडातून दुर्गंधही येणार नाही आणि किटाणूही वाढणार नाहीत. 

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी 

जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर दररोज जेवणामध्ये हिंगाचा वापर करा. हिंगामुळे पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. जसं गॅस, पोटामध्ये होणारा जंतांचा त्रास यांसारख्या समस्या दूर करण्याचं काम हिंग करतो. 

मासिक पाळीतील समस्या

मासिक पाळीतील वेदना, अति रक्तस्त्राव, अनियमित मासिक पाळी यावर हिंग फायदेशीर आहे. हिंगात असे घटक असतात ज्यामुळे महिलांच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉन हार्मान्सचं प्रमाण वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होते.

डोकेदुखी

हिंगाच्या सेवनानं डोकेदुखीची समस्याही कमी होते. हिंगातील अँटिइन्फ्लेममेटरी घटकामुळे मायग्रेन आणि डोकेदुखीची लक्षणं कमी होतात.

कानदुखी

हिंगातील अँटिबायोटिक आणि अँटिइन्फ्लेमेंटरी घटकामुळे कानदुखीची समस्याही दूर होते.

श्वसनाशी संबंधित आजार

हिंग श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठीही मदत करतो. यामध्ये अनेक अॅन्टीवायरल, अॅन्टीबायोटिक तत्व आढळून येतात. हिंग दमा आणि ब्रोकायटिस कमी करण्यासाठी मदत करतो. याचं सेवन करण्यासाठी हिंग पाण्यासोबत वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेस्टवर लावा, त्यामुळे खोकल्यापासून सुटका होण्यास मदत होते. जर तुम्हाला दमा आणि ब्रोकायटिस कमी करायचं असेल, तर त्यासाठी अर्धा चमचा हिंगाची पावडर आलं आणि मधासोबत एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. दिवसातून तीन वेळा याचे सेवन करा. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती असून त्याबाबत आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Pinch of Asafoetida or Hinga gives plenty of health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.