परओनिकिया : बोटांवर होणारा एक त्रासदायक आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 01:58 PM2019-05-12T13:58:38+5:302019-05-12T14:04:31+5:30

हात आणि पायांच्या बोटांजवळ होणाऱ्या त्वचेच्या संक्रमणाला परओनिकिया असं म्हणतात. संक्रमण झालेल्या त्वचेवर सूज येणं, त्वचा लाल होणं आणि वेदना होणं यांसारख्या समस्या होऊ शकतात.

Paronychia know what is the disease of pain in the knuckles of fingers | परओनिकिया : बोटांवर होणारा एक त्रासदायक आजार

परओनिकिया : बोटांवर होणारा एक त्रासदायक आजार

googlenewsNext

(Image Credit : FamilyDoctor.org)

हात आणि पायांच्या बोटांजवळ होणाऱ्या त्वचेच्या संक्रमणाला परओनिकिया असं म्हणतात. संक्रमण झालेल्या त्वचेवर सूज येणं, त्वचा लाल होणं आणि वेदना होणं यांसारख्या समस्या होऊ शकतात. कधी कधी पू भरलेला फोडही येऊ शकतो. खरं तर परओनिकिया ही काही गंभीर समस्या नाही आणि यावर घरच्या घरीच उपचार केले जाऊ शकतात. फार क्वचितच हे संक्रमण हात आणि पायांच्या इतर बोटांमध्ये होऊ शकतं. 

(Image Credit : momjunction.com)

दोन प्रकारचं असतं परओनिकिया :

अक्यूट परओनिकिया

साधारणतः हे लगेच दिसून येतात. अचानक हातांच्या बोटांना सूज येते आणि वेदनांचा सामना करावा लागतो. हे संक्रमण हात किंवा पायांच्या इतर बोटांनाही होऊ शकतं. नखांच्या आजूबाजूची त्वचा लाल होणं, वेदना होणं यांसारख्या समस्या होतात. 

क्रोनिक परओनिकिया

हे असं संक्रमण आहे जे हळूहळू वाढू लागत असून त्या त्वचवर सूजही येते. यामध्ये बोटांच्या आजूबाजूची त्वचा लाल होते. योग्य उपचार केल्याने अक्यूट परओनिकिया 5 ते 10 दिवसांमध्ये ठिक होऊ शकतो. क्रोनिक परओनिकियामध्ये बरेच दिवस औषधं घेण्याची गरज असते. योग्य उपचारानंतर परओनिकिया परत होऊ शकतो. जर पुन्हा त्वचेला जखम झाली तर पुन्हा याचा त्रास होऊ शकतो. 

(Image Credit : iStock)

लक्षणं :

  • बोटांच्या त्वचेवर वेदना होणं, त्वचा लालसर होणं आणि सूज येणं.
  • पू भरलेले फोड येऊ शकतात.
  • नखांच्या आजूबाजूची त्वचा लाल, सूज येणं आणि वेदना होणं
  • फोड फोडल्यानंतर पू येणं
  • संक्रमित भागातील नखं निघून जाणं
  • नखांचा रंग बदलणं 

 

कारणं :

  • परओनिकिया साधारण आजार आहे. त्वचेवर जखम झाल्यास ही समस्या होते. उदाहरणार्थ, नख कापल्यामुळे किंवा खेचल्यामुळे ही समस्या उद्भवते. 
  • बॅक्टेरिया परओनिकिया बॅक्टरिया द्वारे उत्पन्न होतात. 
  • कॅन्डाईडल परओनिकिया विशेष प्रकारच्या यीस्टमुळ उत्पन्न होतो. 
  • फंगल परओनिकिया फंगल इन्फेक्शनमुळे तयार होतो. 

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. 

Web Title: Paronychia know what is the disease of pain in the knuckles of fingers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.