-रवींद्र मोरे 
बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये आपण काही सेलेब्सचे सिक्स पॅक पाहत असतो. सिक्स पॅक बनविण्यासाठी सेलेब्स खूप मेहनत घेत असतात. त्यासाठी ते आहाराबरोबरच नियमित व्यायामदेखील करीत असतात. मात्र ‘सिक्स पॅक एब्स’ आणि ‘एट पॅक्स एब्स’ बनविण्यासाठी आम्ही एका ठराविक वयाची वाट पाहत असतो. मात्र जगातील काही देशांमध्ये असे नाही. यात चीनचाही समावेश आहे. चीनमध्ये लहानपणापासूनच मुलांना आॅलंपिक खेळांसाठी तयार केले जाते आणि त्यानुसार तेथील बालके तशी काळजीही घेतात. 

Image may contain: 1 person, standing

सध्या अशाच एका चीनच्या मुलाने सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ७ वर्षीय बालकाचे ‘एट पॅक एब्स’ पाहून मोठमोठे बॉडी बिल्डर्स आणि सेलिब्रिटीदेखील चकित झाले आहेत. या जिम्नास्ट बालकाचे नाव चेन असून एवढ्या कमी वयातच त्याने खूप प्रसिद्धी मिळविली आहे. नुकतेच त्याने एका जिम्नॅस्टिक स्पर्धेत सहा गोल्ड आणि एक सिल्वर मेडल मिळविले. ‘पीपल्स डेली चायना’ने फेसबुकवर या बालकाचे काही फोटो पोस्ट केले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अवघ्या दोन दिवसातच या फोटोंना सुमारे ३४ हजार लोकांनी लाइक केले तर ७०० लोकांनी शेअरदेखील केले आहेत. शिवाय या फोटोंवर कमेंट्स पण वाढतच आहेत.
 
Image may contain: 2 people, people smiling

‘पीपल्स डेली चायना’नुसार चेन जेव्हा फक्त पाच वर्षाचा होता, तेव्हापासून त्याला एका व्यावसायिक जिम्नॅस्टसारखे प्रशिक्षित केले जात आहे. चेन जेव्हा केजीमध्ये शिकत होता, तेव्हापासून त्याचे धैर्य आणि स्फु र्ती पाहून त्याची जिम्नॅस्टिकसाठी निवड केली गेली. चेनच्या कोचने सांगितले की, तो शिक्षणाबरोबरच आपल्या ट्रेनिंगवर विशेष लक्ष देत असतो.  

Image may contain: 1 person
Web Title: OMG: This' 7-year-old child has' 8 pack abs'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.