आता पुरुषांसाठीही आली गर्भनिरोधक गोळी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 08:25 AM2018-03-23T08:25:00+5:302018-03-23T08:25:00+5:30

गर्भनिरोधकाच्या क्षेत्रात क्रांतिकारक म्हणावी अशी घटना घडली आहे.

Now there is a contraception pill for men! | आता पुरुषांसाठीही आली गर्भनिरोधक गोळी! 

आता पुरुषांसाठीही आली गर्भनिरोधक गोळी! 

नवी दिल्ली - गर्भनिरोधकाच्या क्षेत्रात क्रांतिकारक म्हणावी अशी घटना घडली आहे. वैज्ञानिकांनी पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी विकसित केली आहे. ही गोळी पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. ही गोळी महिलांकरिता असलेल्या गर्भनिरोधक गोळीप्रमाणेच आहे. माकडांवर याची चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे.  व्हेसलक्रिमद्वारे शुक्राणुंच्या प्रवाहाला थांबवता येऊ शकतं असं या चाचणीतून दिसून आले आहे.

प्रायोगिक तत्त्वावर, खास पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या या तोंडावाटे खाण्याच्या गर्भनिरोधक गोळीचं नाव डिमेथॅन ड्रोलोन अनडिकॅनोट (DMAU) असं आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक स्टिफनी पेज यांनी हे संशोधन केलं आहे. शिकागो येथे झालेल्या एंडोक्राइन सोसायटीच्या वार्षिक सभेत प्रा. पेज यांनी हे संशोधन मांडलं. 18 ते 50 वर्षे वयोगटातल्या पुरुषांवर या गोळीचा प्रयोग करण्यात आला. महिलांप्रमाणेच पुरुषांनाही दररोज ही गोळी घ्यावी लागते. 
 
पुरूषांच्या शरीरातील ज्या नलिकेद्वारे शुक्राणू लिंगापर्यंत जातात त्या नलिकेत व्हेसलक्रिम टाकली जाते. माकडांवर दोन वर्ष परीक्षण केल्यानंतर ही क्रिम योग्य कार्य करत असल्याचं समोर आलं आहे.  गर्भनिरोधनासाठी पुरूषांकडे सध्या कंडोम आणि नसबंदी हे दोन मार्ग उपलब्ध आहेत.   
 

Web Title: Now there is a contraception pill for men!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य