डायबिटीजमुळे 'यांना' असतो अकाली मृत्यूचा सर्वात जास्त धोका, रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 10:16 AM2019-04-24T10:16:47+5:302019-04-24T10:20:53+5:30

डायबिटीज हा असा आजार आहे जो बदलत्या लाइफस्टाइलमुळे जगभरात वाऱ्याच्या वेगाने परसत आहे. भारत तर डायबिटीजची मुख्य केंद्र बनत चालला आहे.

New study claims that women at higher risk of death due to diabetes | डायबिटीजमुळे 'यांना' असतो अकाली मृत्यूचा सर्वात जास्त धोका, रिसर्चमधून खुलासा

डायबिटीजमुळे 'यांना' असतो अकाली मृत्यूचा सर्वात जास्त धोका, रिसर्चमधून खुलासा

Next

डायबिटीज हा असा आजार आहे जो बदलत्या लाइफस्टाइलमुळे जगभरात वाऱ्याच्या वेगाने परसत आहे. भारत तर डायबिटीजची मुख्य केंद्र बनत चालला आहे. कारण येथील लोकांची बिघडलेली लाइफस्टाइल. पूर्वी असा समज होता की, डायबिटीज हा जास्त वयात होणारा आजार आहे. पण आता ही धारणा बदलली आहे. धक्कादायक बाब म्हणजे डायबिटीजमुळे अकाली निधनाचा धोकाही वेगाने वाढतो आहे. खासकरुन महिला आणि मध्यम वयाच्या लोकांमध्ये. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार खुलासा झाला आहे की, जगभरात डायबिटीजचे सर्वात जास्त रुग्ण भारत आणि चीन या दोन देशांमध्ये आहेत. 

भारतात किती रुग्ण?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO नुसार सध्या भारतात साधारण ६ कोटी २० लाख असे आहेत जे डायबिटीजने पीडित आहेत आणि पुढील ५ ते ६ वर्षात म्हणजेच २०२५ पर्यंत ही आकडेवारी ७ कोटी पर्यंत पोहोचू शकते. अमेरिकेतील टेनेसी येथील वॅन्डरबिल्ट यूनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या संशोधकांच्या नेतृत्वात एक रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमध्ये असं आढळलं की, जगभरातील खासकरुन आशिया महाद्वीपमध्ये लोकांची लाइफस्टाइल बदलत आङे आणि त्यांच्यात वेगाने लठ्ठपणा वाढत आहे. ज्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांमध्ये अकाली मृत्यूचा धोका वाढला आहे. 

कुणाला जास्त धोका?

या रिसर्चमध्ये भारतासोबतच चीन आणि बांग्लादेशसारख्या देशांतील लोकांचाही समावेश केला गेला आणि साधारण १० लाख लोकांच्या जीवनशैलीचं १२ वर्ष निरीक्षण करण्यात आलं. या रिसर्चमधून असं समोर आलं की, डायबिटीजमुळे मृत्यूचा धोका साधारण दुप्पट वाढला आहे. सोबतच डायबिटीजमुळे अकाली मृत्यूंची प्रकरणे महिलांसोबतच मध्यम वयाच्या रुग्णांमध्येही सर्वात जास्त बघण्यात आले आहेत. 

डायबिटीजपासून दूर राहण्याचे उपाय

- व्यायाम नियमित करा. व्यायामाचे वेगवेगळे फायदे होतात. याने वजन नियंत्रणात राहतं, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते आणि इतरही फायदे होतात. प्रत्येक दिवशी कमीत कमी ३० मिनिटे शारीरित हालचाल करण्याचे अनेक फायदे होतात. 

- पोषक आहार घ्यावा. पोष्टीक कडधान्य, फळं आणि भाज्यांचा आहारात भरपूर समावेश करणे फायदेशीर ठरेल. याने तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुम्ही प्रोसेस्ड आणि रिफाइंड फूड खाणार नाहीत. 

- मद्यसेवन कमी करा आणि धुम्रपान बंद करा. फार जास्त मद्यसेवन केल्याने वजन वाढतं. याने ब्लड प्रेशरने आणि ट्रायग्लिसराइडचा स्तरही वाढतो. तर धुम्रपान करणाऱ्यांना धुम्रपान न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत मधुमेह होण्याचा दुप्पट धोका असतो. त्यामुळे धुम्रपान सोडून द्यावे.

(टिप: आम्ही केवळ ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातील कोणत्याही गोष्टीचा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. त्याशिवाय काहीही करणे महागात पडू शकते.)

Web Title: New study claims that women at higher risk of death due to diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.