New fabric for clothes which will automatically change warm you up or cool down | जबरदस्त... वातावरणानुसार तापमान बदलणारं कापड, थंडीत होणार गरम, उकाड्यात थंड!
जबरदस्त... वातावरणानुसार तापमान बदलणारं कापड, थंडीत होणार गरम, उकाड्यात थंड!

(Image Credit : www.sciencenews.org)

वेगवेगळ्या ऋतूंमध्ये लोक वेगवेगळ्या कपड्यांचा वापर करतात. हिवाळा असेल तर जाड आणि गरम कपडे वापरले जातात, तर उन्हाळ्यात सैल आणि कमी जाड कपडे वापरले जातात. पण आता संशोधकांनी कपड्याचा एक असा प्रकार तयार केला आहे, जो स्वत:हून वातावरणानुसार, तापमान बदलेले. म्हणजे हे फॅब्रिक आपणहून कपड्यातून निघणाऱ्या गरमीला रेग्युलेट करेल. त्यामुळे याने हा कपडा वापरणाऱ्या व्यक्तीला वातावरण आणि हवामानानुसार, थंड किंवा गरम राहण्यास मदत मिळणार आहे.  

हे खासप्रकारचं फॅब्रिक तयार करणाऱ्या संशोधकांनी दावा केला आहे की, जेव्हा वातावरण गरम किंवा दमट असेल तर या फॅब्रिकमधून हिट निघून जाणार आणि वातावरण जेव्हा थंड असेल तेव्हा हे फॅब्रिक हिट बाहेर येण्यापासून रोखेल. 

वातावरणानुसार थंड-गरम होणारा कापड

मॅरिलॅंड यूनिव्हर्सिटी अमेरिकेतील संशोधकांनी सिंथेटिक रेशोवर कार्बन नॅनोट्यूबचं कोटिंग करून एक असा कापड तयार केला की, हा कापड वातावरणानुसार शरीराला गरम किंवा थंड ठेवणार. जेव्हा वातावरण गरम असेल तेव्हा हा कापड शरीरातील गरमी बाहेर जाऊ  देणार आणि घामही शोषूण घेणार आहे. तसेच जेव्ह वातावरण थंड असेल तेव्हा हा कपडा शरीरातील गरमी बाहेर जाऊ देणार नाही. त्यामुळे या खास कपड्यापासून तयार केलेले कपडे तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये परिधान करू शकता. गरमी आणि थंडी दोन्हींमध्ये.

काय म्हणाले संशोधक?

मॅरिलॅंड यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक यूहूआंग वांग म्हणाले की, ही अशी पहिली टेक्नॉलॉजी आहे, ज्याद्वारे आम्ही इन्फ्रारेज रेजला डायनॅमिली प्रवेश करण्याची संधी मिळेल. या नव्या टेक्साटाइल बेसचा धागा अशा फायबरपासून तयार करण्यात आला आहे, जो दोन वेगवेगळ्या सिंथेटिक मटेरिअलपासून तयार आहे. हा धागा स्ट्रॅन्डस कार्बन नॅनोट्यूब्सने कोटेड आहे आणि फार हलका आहे. 

पाणी शोषण्यासोबतच रोखणारा कापड

या फायबरमध्ये असलेलं मटेरिअल पाणी शोषूण घेण्यासोबतच त्याला रोखतं सुद्धा. म्हणजे जेव्हा कापड घाम असलेल्या शरीराच्या संपर्कात येतो तेव्हा कपड्याचा फायबर खराब होतो. यामुळे यार्नचे स्ट्रेन्डस आणखी जवळ येतात आणि या कारणाने फॅब्रिकमध्ये असलेली रोमछिद्रे म्हणजेच पोर्स मोकळे होतात. असे झाल्याने हिट शरीरातून बाहेर येऊ लागते आणि शरीराला थंडी जाणवू लागते. तेच दुसरीकडे थंड्या वातावरणामध्ये शरीर थंड होऊ लागतं, तेव्हा या फॅब्रिकचं मेकॅनिजम उटलं काम करू लागतं. हा कापड शरीरातून गरमी बाहेर जाण्यास रोखतो. 

म्हणजे हा कपडा जर लवकरच बाजारात आला तर याला चांगलीच मागणी वाढण्याची शक्यता आहे. कारण वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घेण्याचा लोकांचा खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळे अनेक दृष्टीने हा कापड फायदेशीर ठरू शकतो. 
 


Web Title: New fabric for clothes which will automatically change warm you up or cool down
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.