पुन्हा पुन्हा ड्रेसिंगच्या कटकटीपासून सुटका करणारं बॅंडेज!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 11:44 AM2019-01-17T11:44:21+5:302019-01-17T11:47:47+5:30

अनेकदा काही जखम झाली तर डॉक्टरांकडे जाऊन वेळोवेळी ड्रेसिंग करावं लागतं. हे सतत करावं लागणारं ड्रेसिंग अनेकांसाठी डोकेदुखीचं कारण ठरतं.

New biodegradable Nanofibre bandage enables faster healing says scientist | पुन्हा पुन्हा ड्रेसिंगच्या कटकटीपासून सुटका करणारं बॅंडेज!

पुन्हा पुन्हा ड्रेसिंगच्या कटकटीपासून सुटका करणारं बॅंडेज!

Next

अनेकदा काही जखम झाली तर डॉक्टरांकडे जाऊन वेळोवेळी ड्रेसिंग करावं लागतं. हे सतत करावं लागणारं ड्रेसिंग अनेकांसाठी डोकेदुखीचं कारण ठरतं. पण संशोधकांनी ही ड्रेसिंगची सततची किटकिट थांबवण्यासाठी एक नवा शोध लावला आहे. 

संशोधकांनी एक असं अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल बॅंडेज विकसित केलंय, जे त्वचेला वेगाने रिपेअर करण्यासोबतच संक्रमणापासूनही बचाव करतं. हे सतत काढून बांधावं लागत नाही. एकदा हे बांधलं की बदलण्याची गरज पडत नाही. हे बॅंडेज बायोडिग्रेडेल आहे. जे हळूहळू त्वचेमध्ये एकरुप होतं. मॉस्कोच्या नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्लॉलॉजी आणि चेक रिपब्लिकच्या ब्रनो यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने मिळून तयार केलं आहे. 

संशोधक एलिजवेटा यांचं म्हणणं आहे की, बॅंडेज पॉलीकापरोलेक्टोन नॅनोफायबरने तयार करण्यात आलं आहे. याच्या फायबरमध्ये जेंटामायसिन आहे. हे बॅंडेज हळूहळू त्वचेमध्ये सामावतं. तसेच ४८ तासांच्या आतच बॅक्टेरियांची संख्या वेगाने कमी होते.

संशोधकांचं म्हणणं आहे की, सामन्यपणे जखम झाली असताना अ‍ॅंटीसेप्टिकचा वापर केला जातो. ज्यामुळे संक्रमण पसरवणारे बॅक्टेरिया तर नष्ट होतातच, सोबतच शरीराला फायदे पोहोचवणाऱ्या जिवाणूही नष्ट होतात. तसेच जखमेवर सतत ड्रेसिंग केल्याने रुग्णाला वेदनाही होतात. 

सूज आल्यावरही केला जाऊ शकतो वापर

रिसर्च दरम्यान बॅंडेजचा प्रभाव ई-कोली बॅक्टेरियावर पाहिला गेला. बॅडेजचा उपयोग जखम भरण्यासोबतच हाडांशी संबंधित सूज येणाऱ्या ऑस्टीओपारोसिसवरही केला जाऊ शकतो.  हा रिसर्च मटेरिअल अ‍ॅन्ड डिझाइन अकॅडमी मॅगझिनमध्ये प्रकाशित केला गेला आहे. 

Web Title: New biodegradable Nanofibre bandage enables faster healing says scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.