नगर बालरोगतज्ज्ञ शाखेला राष्ट्रीय पुरस्कार

By admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:45+5:302017-01-31T02:06:45+5:30

अहमदनगर : बंगलोर येथे झालेल्या ५४ व्या राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ परिषदेत नगर बालरोगतज्ज्ञ संघटनेला राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ शाखेने वर्षभर केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला़

National award for city pediatrician branch | नगर बालरोगतज्ज्ञ शाखेला राष्ट्रीय पुरस्कार

नगर बालरोगतज्ज्ञ शाखेला राष्ट्रीय पुरस्कार

Next
मदनगर : बंगलोर येथे झालेल्या ५४ व्या राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ परिषदेत नगर बालरोगतज्ज्ञ संघटनेला राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ शाखेने वर्षभर केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला़
या परिषदेला १ हजार बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते़ हा पुरस्कार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ़ अनुप सचदेव यांच्या हस्ते नगर शाखेचे अध्यक्ष डॉ़ दिलीप बागल यांच्यासह डॉ़ जयदीप देशमुख, डॉ़ नानासाहेब अकोलकर, डॉ़ शर्वरी पारगावकर, डॉ़ शाहनज आयुब, डॉ़ शाम तारडे, डॉ़ सुचित तांबोळी यांनी स्वीकारला़ यावेळी डॉ़ अजय गंभीर, डॉ़ प्रमोद जोग, डॉ़ बकुळ पारिख उपस्थित होते़ यावेळी शाखेच्या कामकाजाविषयी डॉ़ बागल यांनी उपस्थितांना माहिती दिली़ पुरस्कार मिळाल्याबद्दल शाखेतील पदाधिकार्‍यांचे आयएमए नगर शाखेचे अध्यक्ष व सदस्यांनी अभिनंदन केले आहे़
फोटो २९ पुरस्कार
फोटो ओळी- डॉ़ अनुप सचदेव यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना नगर शाखेचे अध्यक्ष डॉ़ दिलीप बागल़ समवेत डॉ़ जयदीप देशमुख, डॉ़ नानासाहेब अकोलकर, डॉ़ शर्वरी पारगावकर, डॉ़ शाहनज आयुब, डॉ़ शाम तारडे, डॉ़ सुचित तांबोळी आदी़

Web Title: National award for city pediatrician branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.