डाएट क्विन शिल्पा शेट्टी सांगतेय समर स्पेशल कोकम रेसिपी; जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:39 PM2019-05-16T13:39:54+5:302019-05-16T13:40:10+5:30

बॉलिवूडची स्लिम ट्रिम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीचा इंडस्ट्रीमधील टॉप मोस्ट फिटेस्ट अभिनेत्रींमध्येही समावेश होतो. शिल्पा नेहमीच योगाभ्यास करताना दिसून येते.

Lifestyle shilpa shettys favorite summer drink is kokum or Solkadi Slushy know its benefits | डाएट क्विन शिल्पा शेट्टी सांगतेय समर स्पेशल कोकम रेसिपी; जाणून घ्या फायदे

डाएट क्विन शिल्पा शेट्टी सांगतेय समर स्पेशल कोकम रेसिपी; जाणून घ्या फायदे

googlenewsNext

बॉलिवूडची स्लिम ट्रिम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीचा इंडस्ट्रीमधील टॉप मोस्ट फिटेस्ट अभिनेत्रींमध्येही समावेश होतो. शिल्पा नेहमीच योगाभ्यास करताना दिसून येते. तसेच ती आपल्या चाहत्यांसोबतही फिटनेस आणि डाएट टिप्स शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच शिल्पाने आपलं फिटनेस अॅप लॉन्च केलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच शिल्पाने आपल्या फॅन्ससोबत कोकमाचा वापर करून करण्यात येणाऱ्या खास ड्रिंकची रेसिपी शेअर केली होती.

शिल्पाने सांगितल्यानुसार, उन्हाळ्यासाठी हे ड्रिंक अत्यंत खास आहेच, पण हे ड्रिंक वजन कमी करण्यासाठीही मदत करतात. एवढचं नाही तर हे ड्रिंक पोटाच्या समस्या दूर ठेवण्यासाठीही मदत करतात. शिल्पाने सांगितलेल्या या खास ड्रिंकचं नाव आहे Solkadi Slushy. 

घरामध्ये मांसाहारी बेत असल्यानंतर त्याच्या जोडीला सोलकढी हमखास असते. पण शिल्पाने नेहमीच्याच सोलकढीच्या रेसिपीमध्ये थोडेसे बदल करून ही नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

या हटके सोलकढीपासून तयार करण्यात आलेल्या ड्रिंकचे फायदे : 

- Solkadi Slushyच्या सेवनाने मेटबॉलिज्म उत्तम पद्धतीने काम करत, जे वजन कमी करण्यासाठी मदत करतं. 

- कोकमच्या फळामध्ये व्हिटॅमिन-सी, सायट्रिक अ‍ॅसिडसोबतच अनेक न्यूट्रिएंट्स आढळून येतात. याच्या सेवनाने इम्यून सिस्टम आणखी मजबूत होण्यासही मदत होते. 

- कोकमच्या फळांमध्ये आढळून येणारे अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स शरीराची सूज कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच तुमचं आरोग्य उत्तम राखण्यासाठीही गुणकारी ठरतात. 

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी

कोकमामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं आणि यामध्ये कॅलरी अत्यंत कमी प्रमाणात असतात. कोकमामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्स अजिबात नसतात. याव्यतिरिक्त कोकमामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नीज आढळून येतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. एवढचं नाही तर शरीरातील ब्लड प्रेशरही सामान्य राहते. 

वजन कमी करण्यासाठी 

कोकमाच्या फळामध्ये एचसीए आढळून येतं, जे हायपोकलेस्ट्रॉलेमिक एजंटप्रमाणे काम करतं. हे कॅलरीजला फॅट्समध्ये बदलणाऱ्या एंजाइम्सचं काम कमी करतं. 400 ग्रॅम कोकमची फळं 4 लीटर पाण्यामध्ये टाकून उकळून घ्या. जेव्हा पाणी आटून साधारणतः एक लीटर एवढं उरेल त्यावेळी ते गाळून एका भांड्यामध्ये काढून ठेवा. सकाळ-संध्याकाळी 100 मिली. या पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते. 

पोटाच्या समस्यांवर उपयुक्त 

पोटाच्या समस्यांचा सामना करत असाल तर कोकमच्या फळांचे चूर्ण एक ग्लास थंड दूधामध्ये एकत्र करून प्यायल्याने आराम मिळतो. 

सन स्ट्रोकपासून बचाव 

उन्हाळ्यामध्ये कोकम सरबत किंवा कोकमापासून तयार केलेलं कोणतंही पेय आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. कोकम सरबत कोकम, साखर, थंड पाणी, थोडसं जीरं आणि काळं मीठ यांपासून तयार होतं. 

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 

कोकम अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि अ‍ॅन्टी इनफ्लेमेट्री एजंटप्रमाणे काम करून आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं. कोकमामधये असलेले अ‍ॅन्टी-कार्सिनजेनिक तत्व गार्निकॉल, कॅन्सरपासून बचाब करण्यासाठीही मदत करतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Lifestyle shilpa shettys favorite summer drink is kokum or Solkadi Slushy know its benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.