Know What is the secret of Akshay Kumar's fitness! | ​जाणून घ्या काय आहे अक्षय कुमारच्या फिटनेसचे रहस्य!

अक्षय कुमार हा आज बॉलिवूडमधील फिट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. अक्षय आज पन्नास वर्षांचा असला तरी त्याचा फिटनेस खूपच चांगला आहे. त्याचे अॅक्शन सीन तरुण अभिनेत्यांना लाजवतील असे असतात. अक्षयचा हा फिटनेस पाहाता अक्षय त्याच्या फिटनेससाठी काय करतो हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. अक्षयच्या फिटनेसचे रहस्य काय आहे याविषयी त्याने नुकतेच स्टार प्लस वरील द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात सांगितले आहे. 
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात नुकतीच श्रेयस तळपदे आणि साजिद खान यांची एंट्री झाली आहे. या कार्यक्रमात अक्षय सोबतच श्रेयस आणि साजिद देखील परीक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या तिघांची खऱ्या आयुष्यातही खूप चांगली मैत्री असल्याने ती मैत्री छोट्या पडद्यावर देखील दिसून येत आहे. साजिदने दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये अक्षय आणि श्रेयसने एकत्र काम केले आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे कौतुक करण्यासोबतच ही मंडळी एकमेकांची टर खेचत असल्याचे देखील आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसण्याची संधी मिळत आहे.  
अलीकडेच एका भागात परविंदरसिंग हा स्पर्धक आपल्या वाढीच्या वयात सरसों का तेलचे किती महत्त्व आहे, ते सांगत होता. आपल्याला सुदृढ राखण्यासाठी आपली आई सरसों का तेलचा कसा भरपूर वापर करत असे, ते देखील त्याने या कार्यक्रमात अतिशय विनोदी ढंगाने सांगितले. साध्या साध्या गोष्टीही विनोदी कशा करायच्या, याची कला परविंदरला चांगलीच अवगत आहे. त्याच्या या स्कीटवर उपस्थितांना हसू आवरत नव्हते.
परविंदरच्या या वक्तव्याला दुजोरा देताना सुपरजज्ज अक्षय कुमार म्हणाला, “प्रत्येक पंजाबी कुटुंबात हेच घडत असतं, असं मला वाटतं. माझी आईही माझी हाडं मजबूत करून मला सुदृढ ठेवण्यासाठी या तेलाचा भरपूर वापर करत असे. माझ्या तंदुरुस्तीचं रहस्य कदाचित यातच दडलेलं आहे.
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमामुळे अक्षय कुमारच्या तगड्या आणि काटक शरीरयष्टीचे रहस्य आता सगळ्यांना कळाले आहे. 

Also Read : अक्षय कुमारने शेअर केला असिनच्या मुलीचा पहिला फोटो

Web Title: Know What is the secret of Akshay Kumar's fitness!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.