पृथ्वीवरचे अमृत आहे ताक : जाणून घ्या महत्वाचे फायदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:54 PM2019-03-22T15:54:23+5:302019-03-22T16:01:45+5:30

आयुर्वेदात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. 

Know important benefits of buttermilk | पृथ्वीवरचे अमृत आहे ताक : जाणून घ्या महत्वाचे फायदे 

पृथ्वीवरचे अमृत आहे ताक : जाणून घ्या महत्वाचे फायदे 

googlenewsNext

पुणे : आयुर्वेदात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. 

ताकात विटामिन ”बी  12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक  प्यायल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. माणसाने  दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते 

  •  ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. 

 

  •  वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. 

 

  • दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. 

 

  •  ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटदुखी थांबते .

 

  • ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

 

  • थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. 

 

  •  रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते. 

 

  • ताकात साखर आणि चिमूटभर काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. 

 

  •  लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.

Web Title: Know important benefits of buttermilk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.