डाएट ड्रिंक्समुळे खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 12:16 PM2019-05-05T12:16:51+5:302019-05-05T12:22:26+5:30

कामाचा वाढता ताण आणि धावपळीची जीवनशैली यामुळे आपल्यापैकी प्रत्येकालाच आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच अनेक तज्ज्ञ योग्य आणि परिपूर्ण आहार घेण्याचा सल्ला देतात.

Know drinking diet drinks make fat increase or decrease | डाएट ड्रिंक्समुळे खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या सत्य

डाएट ड्रिंक्समुळे खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या सत्य

Next

(Image Credit : Creative Healthy Family)

कामाचा वाढता ताण आणि धावपळीची जीवनशैली यामुळे आपल्यापैकी प्रत्येकालाच आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच अनेक तज्ज्ञ योग्य आणि परिपूर्ण आहार घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्यांसोबतच आरोग्याच्या इतरही समस्या दूर होण्यास मदत होते. परंतु बऱ्याचदा शरीराचं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी इतरही अनेक उपाय करण्यात येतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पेय पदार्थांचा म्हणजेच ड्रिंक्सचा समावेश करण्यात येतो. अनेकदा बाजारात अशा अनेक वजन कमी करण्याचा दावा करणारी किंवा नो कॅलरी ड्रिंक्स उपलब्ध असतात. आपणही त्यांच्या जाहिरांतींना बळी पडून त्यावर विश्वास ठेवून दररोजच्या आहारात त्यांचे सेवन करतो. पण खरं तर या ड्रिंक्स वजन कमी करत नाहीत, याउलट या ड्रिंक्स वजन वाढविण्याचं काम करतात. 

सॉफ्ट ड्रिंक्स

लोक वजन वाढू नये म्हणून अनेक सॉफ्ट ड्रिंक्सचा आहारात समावेश करतात. त्यांचा असा समज असतो की, हे ड्रिंक्स प्यायल्याने शरीरामध्ये कॅलरीचे प्रमाण वाढत नाही. परंतु, या ड्रिंक्सच्या सेवनाने भूक वाढते. त्यानंतर अनेकांना ओव्हरइटिंगचा सामना करावा लागतो. परिणामी लठ्ठपणा कमी होण्याऐवजी वाढतो. 

पॅकेटबंद ज्यूस

पॅकेटबंद ज्यूसचा अनेक लोक आपल्या डाएटमध्ये समावेश करतात. या पॅकेटबंद ज्यूसमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात आणि हे ड्रिंक्समध्ये मोठ्या प्रमाणावर साखरही असते. ज्यामुळे शरीरामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरी मुबलक प्रमाणात वाढतात. यामुळेही वजन कमी होण्याऐवजी वाढते. 

आइस-टी 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक लोक आइस-टी पितात. कारण यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? बाजारत मिळणाऱ्या आइस-टीमध्ये कॅलरी मोठ्या प्रमाणात असण्यासोबतच त्या शरीराला नुकसान पोहोचवतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्याऐवजी वाढविण्यासाठी त्या कारणीभूत ठरतात. 

कॉफी 

जास्तीत जास्त लोकांचा असा समज असतो की, चहा आरोग्यासाठी घातक ठरतो. त्यामुळे ते चहा पिणं बंद करून कॉफी पिणं सुरू करतात. पण दूधापासून तयार करण्यात आलेल्या कॉफीमध्ये असलेल्या कॅलरी शरीराचं वजन वाढवतात. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Know drinking diet drinks make fat increase or decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.