इनडोअर सायकल.. व्यायाम आणि आरोग्यासाठी उत्तम पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 04:09 PM2017-11-14T16:09:18+5:302017-11-14T16:10:10+5:30

महिला, पुरुष, मुलं.. सगळ्यांसाठी एक हटके प्रकार..

Indoor cycle .. Best choice for exercise and health! | इनडोअर सायकल.. व्यायाम आणि आरोग्यासाठी उत्तम पर्याय!

इनडोअर सायकल.. व्यायाम आणि आरोग्यासाठी उत्तम पर्याय!

googlenewsNext
ठळक मुद्देगुडघेदुखी असलेलेही सायकलिंग करू शकतात,अनेकांना, त्यातही महिलांना सायकल चालवण्याचा कंटाळा येतो आणि लाजही वाटते. त्यांच्यासाठी इनडोअर सायकल अतिशय उपयुक्त.कोणत्याही वयोगटातील कोणीही ही सायकल चालवू शकतं. हळूहळू सुरुवात करून त्याचा वेळ आणि तीव्रताही आपण वाढवू शकतो.

- मयूर पठाडे

तुम्ही व्यायाम करता? करतही असाल. आजकाल अनेक जण हौशीनं व्यायामाला जातात. त्याचे फायदे सगळ्यांनाच माहीत आहेत. कोणी रनिंगला जातं कोणी जिममध्ये जाऊन घाम गाळायला लागतं. पण काही काळ व्यायाम केल्यानंतर, विशेषत: रनिंग केल्यानंतर अनेकांना गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. कारण व्यायाम सुरू करायचा म्हटल्यावर बहुतेक सगळेजण अगोदर रनिंग किंवा जॉगिंगपासून, सकाळी ग्राऊंडवर फिरायला जाण्यापासून सुरुवात करतात. त्याचाही फायदा होतोच, नाही असं नाही, पण आपण कुठे चालतो, कसं चालतो, पायात कोणते शुज आहेत, या साºया गोष्टींवर तुमची गुडघेदुखी अवलंबून असते. त्यामुळे तज्ञांचा सल्ला असतो, त्यापेक्षा तुम्ही सायकलिंग करा.
गुडघेदुखी असलेलेही सायकलिंग करू शकतात, पण अनेकांना, त्यातही महिलांना सायकल चालवण्याचा कंटाळा येतो आणि लाजही वाटते. या वयात कुठे सायकल चालवायची म्हणून तो विचारच ते सोडून देतात. त्यामुळे अशा अनेक लोकांसाठी इनडोअर सायकल, म्हणजे व्यायामाची घरात एका जागी ठेऊन ज्यावर व्यायाम करता येतो अशी सायकल अतिशय उपयुक्त. ही सायकलही विकत घेण्याची गरज नसते. आजकाल बºयाच जिममध्ये अशा सायकली असतात. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही सायकल तुम्ही चालवू शकता.
कोणत्याही वयोगटातील कोणीही ही सायकल चालवू शकता. हळूहळू सुरुवात करून त्याचा वेळ आणि तीव्रताही आपण वाढवू शकतो. त्याचे अनेक फायदे आहेत आणि मुख्य म्हणजे कोणत्याही काळात तुम्ही सहजपणे ती चालवू शकता. उन्हाळा, हिवाळा, उन्हाळा, अगदी काहीही!
रस्त्यावर चालवण्याच्या सायकलींना तरी काही प्रमाणात मर्यादा पडतात, पण या सायकलिंगला नाही..
त्यामुळे करा सुरुवात सायकलिंगला आजपासूनच.
या सायकलिंगचे काय फायदे आहेत ते पाहूया पुढच्या भागात..

Web Title: Indoor cycle .. Best choice for exercise and health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.