वजन कमी करण्यासाठी तुम्ही या चुका तर करत नाही आहात ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 10:12 AM2018-11-08T10:12:04+5:302018-11-08T10:12:18+5:30

वजन वाढणं ही समस्या आता सामान्य झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपलं वजन कमी करण्यासाठी जमेल ते प्रयत्न करत असतात.

If you make these mistakes in order to lose weight, are not you? | वजन कमी करण्यासाठी तुम्ही या चुका तर करत नाही आहात ना?

वजन कमी करण्यासाठी तुम्ही या चुका तर करत नाही आहात ना?

Next

वजन वाढणं ही समस्या आता सामान्य झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपलं वजन कमी करण्यासाठी जमेल ते प्रयत्न करत असतात. कुणी, डाएट करतं, कुणी जिम लावतं, कुणी केवळ फळं खातात तर कुणी आणखी काही करतात. पण हे प्रयत्न करुनही अनेकांना वजन कमी करण्यात यश येत नाही. बरं वजन वाढल्याने केवळ तुम्ही जाड दिसता असे नाही तर याने वेगवेगळ्या आजारांचाही सामना करावा लागतो.

वजन कमी करण्यासाठी वाढलेल्या वजनाने हैराण प्रत्येक व्यक्ती काहीना काही प्रयत्न करीत असतो. काही दुसऱ्यांकडून सल्लाही घेतात. पण प्रत्येकाला प्रत्येक उपाय लागू होतो किंवा फायद्याचा ठरतो असे नाही. प्रत्येकाही शरीराची रचना वेगळी असते, त्यामुळे त्यानुसार वजन कमी करण्याचा पर्याय निवडणे गरजेचे आहे. कारण तुमच्या शरीरानुसार पर्याय निवडला नाही तर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करत असाल तर तुम्हाला वजन कमी करणं जास्त महागात पडू शकतं, ते कसं हे जाणून घ्या.

जेवण बंद करणं

काही लोकांना असं वाटत असतं की, जेवण करणे बंद केल्याने त्यांचं वजन लगेच कमी होईल. पण असं काहीही नाहीये. याने तुम्हाला शारीरिक कमजोरी येऊ शकते. असे केल्याने मेटाबॉलिज्म कमी होतं, ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यासही अडचण होते. त्यामुळे वजन कमी करताना जेवण बंद करण्याऐवजी हेल्दी आहार घेणे गरजेचं आहे. 

फॅट फ्री डाएट

काही लोक असेही असतात, जे वजन कमी करण्यासाठी केवळ फॅट फ्री डाएटवर अवलंबून राहतात. पण या आहारात काहीच चव राहत नाही. सोबतच याने तुम्ही आजाराही होऊ शकता. हेल्दी फॅटचं सेवन न केल्याने तुम्हाला मानसिक थकवा जाणवू शकतो. 

केवळ ज्यूस डाएट

केवळ ज्यूस प्यायल्याने तुमची प्रोटीनची गरज भागणार नाही. दिवसभर केवळ ज्यूस प्यायल्याने तुम्हाला हलकं वाटतं. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते, पण यातून तुमच्या शरीराला प्रोटीन मिळणार नाही. अशात ज्यूस डाएटने तुम्ही केवळ मसल्स कमी करु शकता, फॅट नाही.

तासंतास वर्कआउट

जास्त वर्कआउट केल्याने तुम्हाला अधिक भूक लागते. तुम्ही जितकी जास्त एक्सरसाइज कराव तितकी जास्त तुम्हाला कॅलरी बर्न करण्याला मदत होईल. जास्त वर्कआउट केल्याने तुम्हाला जास्त भूक लागेल आणि तुम्ही जास्त खाल. याने तुम्हाला वजन कमी करण्यास अडचण तर येईलच सोबतच तुमची वर्कआउटची मेहनतही वाया जाईल. 

विनेगर सेवन

काही लोकांचं असं मत असतं की, विनेगर सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल योग्य प्रमाणात राहते. याने तुम्हाला पोट भरल्यासारखं जाणवतं. पण दररोज विनेगरचं सेवन केल्याने गळा आणि पोट खराब होऊ शकतं.

Web Title: If you make these mistakes in order to lose weight, are not you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.