चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; असं करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 04:17 PM2019-05-22T16:17:13+5:302019-05-22T16:23:16+5:30

चपात्या तयार करण्यासाठी दररोज पीठ मळण्यात येतं. अनेकदा उरलेलं पीठ आपण फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या पिठाच्या चपात्या तयार करतो.

If you eat roti made from dough keeping in the fridge can make you sick | चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; असं करणं पडू शकतं महागात

चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; असं करणं पडू शकतं महागात

googlenewsNext

(Image Credit : taste.com.au)

चपात्या तयार करण्यासाठी दररोज पीठ मळण्यात येतं. अनेकदा उरलेलं पीठ आपण फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या पिठाच्या चपात्या तयार करतो. अनेकदा जॉब करणाऱ्या महिला वेळेचं मॅनेजमेंट करण्यासाठी पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवून देतात. जशी गरज असेल तसं फ्रिजमधील पिठाचा वापर करतात. यामुळे नक्कीच वेळ वाचतो. परंतु तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहीत नसेल की, अनेक असे पदार्थ असतात. ज्यांचं फ्रिजमध्ये ठेवून सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. जर तुम्हीही दररोज पीठ फ्रिजमध्ये ठेवत असाल तर असं करणं तत्काळ थांबवा. 

फ्रिजमध्ये पीठ मळून ठेवण्याची तुमची ही सवय तुम्हाला कदाचित महागात पडू शकते. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. परंतु हेचं खरं आहे. फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पिठ मळल्यानंतर लगेचच त्याचा वापर केला पहिजे. जेव्हा तुम्ही पीठ मळल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवता, त्यावेळ त्यामध्ये रासायनिक बदल होतात. हे बदल आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिजमधील हानिकारक किरणं त्यावर परिणाम करतात. त्यामुळे पिठामध्ये काही रासायनिक क्रिया घडून येतात. जेव्हा तुम्ही अशा पिठापासून चपाती तयार करून खाता. त्यावेळी तुमचं आजारी पडणं स्वाभाविक आहे. 

पीठ फ्रिजमध्ये ठेवावं की नाही?

आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, फ्रिजमध्ये पीठ मळून ठेवू नये. शिळ्या पिठाच्या चपात्यांची चव ताज्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या चपात्यांपेक्षा वेगळी असते. 

फर्मेंटेशनची प्रक्रिया

ओल्या पिठामध्ये फर्मेंटेशनची क्रिया लवकर सुरू होते. त्यामुळे या पिठामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि हानिकारक केमिकल्स तयार होतात. हे सर्व बॅक्टेरिया आरोग्याला नुकसान पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरतात. यापासून तयार केलेल्या चपात्या खाल्यामुळे पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

पोटदुखी

शिळ्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या चपात्या, पुऱ्या किंवा पराठे शिळे असतात. यामुळे त्या सर्व समस्यांना सामोरं जावं लागतं ज्या शिळ्या चपात्या खाल्याने होतात. खासकरून पोटदुखीचा त्रास होणं एक सामान्य समस्या आहे. 

बद्धकोष्ट 

गव्हाचं पीठ पचण्यासाठी जड असतं. ज्या व्यक्तींना बद्धकोष्टाचा सामना करावा लागतो त्यांना चपात्या न खाण्याचा सल्ला देण्यात येतो. शिळ्या चपात्या खाल्यानेसामान्य लोकांनाही बद्धकोष्टाची समस्या होऊ शकतात.  

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: If you eat roti made from dough keeping in the fridge can make you sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.