तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडण्याचं कारण तुमच्या बेडमध्येच तर दडलेलं नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 09:52 AM2019-03-23T09:52:35+5:302019-03-23T09:55:27+5:30

दररोज दिवसभराच्या थकव्यानंतर प्रत्येकालाच आरामाची गरज असते. प्रत्येकाला कधी घरी जाऊन एकदाचं बेडवर पडतो असं होतं.

If you are getting sick shortly your pillow may be the cause | तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडण्याचं कारण तुमच्या बेडमध्येच तर दडलेलं नाही ना?

तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडण्याचं कारण तुमच्या बेडमध्येच तर दडलेलं नाही ना?

Next

(Image Credit : Video Blocks)

दररोज दिवसभराच्या थकव्यानंतर प्रत्येकालाच आरामाची गरज असते. प्रत्येकाला कधी घरी जाऊन एकदाचं बेडवर पडतो असं होतं. खास बाब ही असते की, घरात प्रत्येकाचे बेड, उश्या आणि चादरी वेगवेगळ्या असतात. या वस्तू जर इतर कुणी वापरलेल्या काही लोकांना चालत नाही. किंवा चुकून दुसऱ्यांची उशी वापरावी लागली तर चांगली झोपही येत नाही. हेच चादर आणि उशी किंवा बेडबाबत होतं. पण तुम्हाला जर सतत सर्दी, ताप, कफ किंवा खोकला होत असेल तर याचं कारण तुमच्या बेडमध्येच लपलं आहे. 

दोन वर्ष आहे यांचं जीवन

जर तुम्हाला कोणत्या प्रकारची अ‍ॅलर्जी, इन्फेक्शन, खोकला किंवा सर्दी पुन्हा पुन्हा होत असेल तर तुम्ही वेळीच तुमची उशी बदलायला हवी. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोणत्याही उशीचा दोन वर्षांपेक्षा अधिक वापर करू नये. दोन वर्षांपेक्षा जास्त जर उशीचा वापर केला गेला तर याने आरोग्याशी संबंधित समस्या होऊ शकतात. यात सर्वात जास्त धोका असतो तो अ‍ॅलर्जी आणि इन्फेक्शनचा.

असं का?

उशी आणि बेडबाबत वेळोवेळी वेगवेगळे रिसर्च होत असतात. एक्सपर्ट्स सांगतात की, २ वर्षांपेक्षा अधिक उशीचा वापर करू नये कारण त्यावर डेड स्कीन सेल्समुळे अनेकप्रकारचे बॅक्टेरिया आणि विषाणू वाढत असतात. हे श्वासासोबत आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपल्याला आजारी करतात. अनेकदा या बॅक्टेरियामुळे स्कीन इन्फेक्शनचं कारणही ठरतात.

नेमकं चुकतं कुठे?

अनेकदा आपण केसांना ऑयलिंग केलेलं असतं आणि आपण उशीवर डोकं ठेवून झोपतो. यादरम्यान उशीच्या आतील फायबर आपल्या डोक्याचं तेल शोषून घेतं. सोबतच आपल्या डोक्याची डेड स्कीन सेल्सही उशीवर लागतात. तसेच धुळीचे कण, मातीही त्यात असते. अनेकजण आजारी असतात तेव्हाही याच उशींचा वापर करतात.  त्यामुळे समस्या कमी होण्याऐवजी अधिक वाढते. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, सामान्य स्थितीमध्ये आपण दर सहा महिन्यांनी उशी बदलायला हवी. 

गादीचं पण असतं लाइफ

तुमची गादी कॉटनची असो वा फोमची पण हे ध्यानात ठेवायला हवं की, गादीचं सुद्धा लाइफ असतं. अनेकदा डॉक्टरही गादी बदलण्याचा सल्ला देतात. केवळ गादीवरील चादर बदलून चालत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या गाद्यांची लाइफ वेगवेगळी असते. सामान्यपणे ५ ते १० वर्षात गादी बदलायला हवी असं सांगितलं जातं. 

Web Title: If you are getting sick shortly your pillow may be the cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.