झोपेच्या गोळ्यांचे सेवन करता का?; जाणून घ्या यामुळे होणाऱ्या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 04:39 PM2019-04-16T16:39:10+5:302019-04-16T16:41:25+5:30

सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे आपलं बेडरूमही गॅझेट्सनी भरून गेलं आहे. टेलिव्हिजन, लॅपटॉप यासारखे गॅझेट्स तर होतेच पण आता त्यांच्या जोडीला मोबाईलही आला आहे.

If you also take sleeping pills then know the danger | झोपेच्या गोळ्यांचे सेवन करता का?; जाणून घ्या यामुळे होणाऱ्या समस्या

झोपेच्या गोळ्यांचे सेवन करता का?; जाणून घ्या यामुळे होणाऱ्या समस्या

Next

(Image Credit : Everyday Health)

सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे आपलं बेडरूमही गॅझेट्सनी भरून गेलं आहे. टेलिव्हिजन, लॅपटॉप यासारखे गॅझेट्स तर होतेच पण आता त्यांच्या जोडीला मोबाईलही आला आहे. हाच मोबाईल रात्री उशिरापर्यंत हातात असतो. ज्याचा सर्ना मोठा दुष्परिणाम म्हणजे, याचा आपल्या आरोग्यासोबतच झोपेवर परिणाम होतो. नवीन लाइफस्टाइल फॉलो करणाऱ्या अनेक लोकांना आता झोप न येण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या इतक्या वाढल्या आहेत की, त्यांना झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय शांत झोपच लागत नाही. जर तुम्हालाही झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय लागली असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. जाणून घेऊया कसं...

का येत नाही झोप?

शहरातील लाइफस्टाइल, फास्टफूडचा अधिक वापर आणि ताण झोप न येण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. ही समस्या लोकांना एवढं प्रभावित करते की, त्यांना झोपेच्या गोळ्या घेण्याशिवाय पर्यायच नसतो. सुरुवातीच्या काळीत या गोळ्यांमुळे माणसांना शांत झोप लागते. पम कालांतराने या गोळ्यांची सवय होते. पण हिच सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तसेच बराच वेळ यांच्या सेवनाने आरोग्यावर विपरित परिणाम घडून येतात. 

काय म्हणतं संशोधन?

झोपेच्या गोळ्यांचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी अनेक संशोधनं करण्यात येत आहेत. त्यापैकीच एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, सतत झोपेच्या गोळ्यांचं सेवन केल्याने त्याचा ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. स्पेनमधील एका यूनिवर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, नियमितपणे झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याने वृद्धपकाळात हाय ब्लड प्रेशरच्या धोका वाढतो. 

असं करण्यात आलं संशोधन

हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी ताण आणि हाय ब्लड प्रेशरन ग्रस्त असणाऱ्या जवळपास 750 लोकांना सहभागी केलं होतं. संशोधनादरम्यान, असं आढळून आलं की, जवळपास 156 लोकांनी अ‍ॅन्टीहायपरटेंसिव औषधांच्या संख्येमध्ये वाढ केली. यामुळे झोपेची वेळ किंवा क्वालिटी आणि अ‍ॅन्टीहायपरटेंसिव ड्रगच्या वापरामध्ये काही संबंध आढळून आला नाही. संशोधकांच्या मते, झोपेच्या गोळ्यांच सेवन भविष्यामध्ये हाय ब्लड प्रेशरवर आणि अनहेल्दी लाइफस्टाइलचं कारण ठरतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या आहेत. आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून यातून कोणताही दावा करत नाही. 

Web Title: If you also take sleeping pills then know the danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.