झटपट वजन कमी करण्यासाठी 'हा' डाएट प्लॅन ठरतो उपयोगी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:50 PM2019-02-05T18:50:40+5:302019-02-05T18:53:23+5:30

वजन कमी करण्यासाठी लोकं वेगवेगळे उपाय करत असतात. त्यासाठी डाएट प्लॅन, फिटनेस टिप्स यांसारख्या उपायांसोबतच बाजारात मिळणाऱ्या औषधांचाही आधार घेण्यात येतो. पण अनेकदा हे सर्व प्रयत्न व्यर्थ असतात.

How to lose weight with bean diet plan | झटपट वजन कमी करण्यासाठी 'हा' डाएट प्लॅन ठरतो उपयोगी!

झटपट वजन कमी करण्यासाठी 'हा' डाएट प्लॅन ठरतो उपयोगी!

googlenewsNext

वजन कमी करण्यासाठी लोकं वेगवेगळे उपाय करत असतात. त्यासाठी डाएट प्लॅन, फिटनेस टिप्स यांसारख्या उपायांसोबतच बाजारात मिळणाऱ्या औषधांचाही आधार घेण्यात येतो. पण अनेकदा हे सर्व प्रयत्न व्यर्थ असतात. तसेच अनेकदा यांचे दुष्परिणामही भोगावे लागतात. तसेच डाएट प्लॅनमुळेही अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. डाएटसोबत एक्सपरिमेंट करणाऱ्यांनी एक अनोखा डाएट प्लॅन शोधून काढला आहे. ज्याचं नाव आहे 'बीन्स डाएट प्लॅन'. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी हा डाएट प्लॅन कसा फायदेशीर ठरतो त्याबाबत...

बीन्स डाएट प्लॅनमध्ये बीन्स, फळं आणि डाळींचा आहारात समावेश करण्यात येतो. यामध्ये राजमा, सोयाबीन, मटार, चणे, उडीद, मसूर, मूग, मसूर यांसारख्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. या पदार्थांना आपण सूपरफूडही म्हणू शकतो. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतं. याव्यतिरिक्त यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन-बी, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम यांसारखी लाभदायक तत्वही असतात. 

बीन्स डाएट प्लॅनचे फायदे :

डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच वजन कमी होण्यासाठी, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठीही मदत होते. हे डाएट फॉलो केल्यामुळे खूप वेळापर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे कॅलरीजही कमी खर्च होतात. तसेच या बीन्स आणि फळांचा ग्‍लाइसीमिक इंडेक्‍सही फार कमी असतात. त्यामुळे डायबिटीजच्या रूग्णांसाठीही हे अत्यंत फायदेशीर समजलं जातं. 

काळजी घ्या :

फळं खाल्याने पोटाच्या समस्या आणि गॅस तयार होण्याची समस्या होऊ शकते. यापासून बचाव करण्यासाठी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता. तसेच हे खाताना व्यवस्थित चावून खा. त्यामुळे गॅसची समस्या उद्भवणार नाही. 

बीन डाएट फॉलो करताना डाएटमध्ये एकाच प्रकारच्या बीन्सचा समावेश न करता वेगवेगळ्या बीन्सचा समावेश करणं आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या शरीराची पाचन क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे सर्वच बीन्स प्रत्येकालाच सूट होतील असं नाही. म्हणून वेगवेगळ्या बीन्सचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: How to lose weight with bean diet plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.