जंक फूडच्या विळख्यातून कसं सुटाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 03:40 PM2017-08-21T15:40:39+5:302017-08-21T15:42:20+5:30

सोप्पं आहे.. करून तर पाहा!..

how to keep away yourself from junk food? | जंक फूडच्या विळख्यातून कसं सुटाल?

जंक फूडच्या विळख्यातून कसं सुटाल?

Next
ठळक मुद्देखूप भूक लागेल इतक्या वेळ उपाशी राहू नये आणि क्वॉलिटी फूडवर कटाक्ष द्यावा.चालायला जाणं, व्यायाम, योगा.. अशा गोष्टी केल्यास ताण कमी होतो आणि जंकफूडपासूनही आपण लांब राहतो.झोप कमी झालेली असली, तर जंक फूडकडे तुमचा ओढा वाढू शकतो.स्पोर्ट्स ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, शुगर ड्रिंक्स, सोडा.. यासारख्या पादार्थांना लांबूनच रामराम करायला हवा.

- मयूर पठाडे

चटकमटक काही समोर दिसलं की आपल्याला लगेच ते तोंडात का टाकावंसं वाटतं? घरी केलेल्या स्वयंपाकापेक्षा याच आणि अशाच गोष्टींची चटक आपल्याला का लागते? जंक फूडच्या आपण एवढं प्रेमात का पडतो? जंक फूडचा पिच्छा सोडवायचा असेल तर त्यासाठी काय करता येईल?..
मुळात जंकफूडच्या प्रेमात आपण पडतो, कारण त्याच्या रंगरुपापासून तर त्यांच्या टेस्टपर्यंत सारंच काही टेम्प्टिंग असतं. त्यामुळे आपसूकच आपण त्यांच्या प्रेमात पडतो. शिवाय आपल्या आजूबाजेचे सारेच जण येता जाता तेच खात असतात, त्याच आणि तशाच गोष्टी आपल्या पुढ्यात येत असतात. बºयाचदा त्या गोष्टींशिवाय पर्यायही नसतो आणि झटपट ते आपल्या हातात मिळत असल्यामुले वेळ वाचवण्यासाठीही आपण जंक फूडकडे आकर्षित होतो.

जंक फूडपासून स्वत:ला कसं वाचवाल?
१- मुळात वेळच्या वेळी आपल्या पोटात गेलेलं नसलं, तर वेळी अवेळी आपल्याला भूक लागते आणि मग समोर जे दिसेल त्यावर आपण तुटून पडतो. त्यामुळे खूप भूक लागेल इतक्या वेळ एकतर उपाशी राहू नये आणि जेव्हा केव्हा आपण खाऊ त्या प्रत्येक वेळी ते क्वॉलिटी फूड असेल याकडे आपला कटाक्ष असायला हवा.
२- ‘क्रॅश डाएट्’चं सध्या फार फॅड आहे. लवकरात लवकर आणि पटकन आपल्या पुढ्यात जे खाद्यपदार्थ येतात, जे चटकदारही असतात, ते खाण्याकडे साहजिकच आपला कल असतो. अशा भुलभुलैयापासून आपण जाणीवपूर्वक दूर राहायला हवं.
३- साखरचं प्रमाण जास्त असलेल्या पेयांपासून कटाक्षानं दूर राहायला हवं. कारण त्यातून आपण कॅलरीज पित असतो. तुम्ही व्यायामपटू असाल, तुमचं खूप एक्सरशन होत असेल, तर ठीक, अन्यथा, स्पोर्ट्स ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, शुगर ड्रिंक्स, सोडा.. यासारख्या पादार्थांना लांबूनच रामराम करायला हवा.
४- खूप वेळ ताण सहन करावा लागणार नाही अशी परिस्थिती आपण स्वत:च निर्माण करायला हवी. कामाचा ताण आपल्याला जाणवतोय, असं वाटायला लागल्याबरोबर त्यापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या जवळच्या मित्रांशी बोलणं, गप्पा मारणं, चालायला जाणं, व्यायाम, योगा.. अशा गोष्टी केल्यास ताण कमी होतो आणि जंकफूडपासूनही आपण लांब राहतो.
५- काहीही झालं तरी आपली झोप व्यवस्थितच व्हायला हवी. झोप कमी झालेली असली, की त्याचे शरीरावर तर विपरित परिणाम होतातच, पण याच कारणामुळे जंक फूडकडे तुमचा ओढा वाढू शकतो.

Web Title: how to keep away yourself from junk food?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.