तुमचा फिटनेस ट्रेनर कसा निवडाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 05:52 PM2017-12-26T17:52:07+5:302017-12-26T17:53:31+5:30

अयोग्य ट्रेनर तुमच्या आरोग्याचे वाजवू शकतो तीनतेरा!

 How to choose your fitness trainer? | तुमचा फिटनेस ट्रेनर कसा निवडाल?

तुमचा फिटनेस ट्रेनर कसा निवडाल?

ठळक मुद्देतुमच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करायला लावणाºया ट्रेनरपासून सावध राहा.काही ट्रेनर काय करायचं हे तुम्हाला सांगतात, पण नंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करून गप्पांत नाहीतर मोबाईलमध्ये मग्न राहातात.जो ट्रेनर स्वत:च फिट नसेल, तर त्याच्याकडून आपल्याला काय मोटिव्हेशन मिळणार?

- मयूर पठाडे

तुमचं अंतिम उद्दिष्ट काय आहे?.. अर्थातच व्यायाम सुरू केल्यानंतर फिटनेस हेच प्रत्येकाचं ध्येय असणार? पण हा ‘नेमका’ फिटनेस आणायचा तरी कुठून आणि कसा?..
अनेकदा आपण आपल्या मनानंच, पूर्वी कुठे काही पाहिलेलं, ऐकलेलं असेल, आपले मित्र-मैत्रिणी ज्याप्रमाणे वर्कआऊट करीत असतील किंवा जिममध्ये आपला ट्रेनर ज्या पद्धतीनं सांगेल त्याप्रमाणेच आपण व्यायाम करतो.
व्यायाम सुरू केल्यानंतर खरंतर योग्य ट्रेनरच्या हाताखाली व्यायाम करणं केव्हाही चांगलंच.
पण हा ट्रेनर निवडायचा कसा हाच मुख्य प्रश्न असतो.
योग्य ट्रेनर निवडता येणं तसं अवघडच, पण त्यासाठी थोडं उलट्या मार्गानं गेलं तर आपला प्रश्न सुटू शकतो. म्हणजे चांगला ट्रेनर निवडण्यापेक्षा ‘ट्रेनर कसा असू नये?’, याची चाळणी आपण लावली तर आपोआपच आपल्याला चांगला ट्रेनर मिळू शकतो. असा चांगला ट्रेनर मिळणं हे खरचं भाग्याचं असतं आणि त्यामुळे आपल्या आरोग्याचा आणि फिटनेसचा प्रश्न खरोखरच निकाली निघू शकतो.
कसा असू नये ट्रेनर?
१- पुशी ट्रेनर- काही ट्रेनर असे असतात, जे तुमच्यामागे सारखा लकडा लावतात, अजून व्यायाम कर, अजून कर.. त्यामुळे तुमची फिटनेस लेवल वाढेल, असं ते आपल्याला ‘पूश’ करीत असतात. अनेकदा हा लकडा तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करायला लावण्याचा असतो. यातला पहिला आणि अप्रत्यक्ष धोका म्हणजे व्यायाम करणारा अशा ट्रेनरच्या प्रेमात पडू शकतो. कारण त्याला ते मोटिव्हेशन वाटू शकतं. पण अशा ट्रेनरपासून थोडं लांबच राहायला हवं आणि त्यालाही आपण वेळीच ओळखायला हवं.
२- लेझी ट्रेनर- असे ट्रेनर तुम्हाला काय व्यायाम करायचा, कसा करायचा हे तर सांगतात, पण एकदा तुम्हाला सांगितलं, की त्यांचं काम झालं! त्यानंतर त्यांचं तुमच्याकडे लक्ष नसतं. तुम्ही कुठे चुकताय का हेदेखील ते बघत नाहीत. ते आपल्या आपल्या कामात, मोबाइलवर नाहीतर गप्पांमध्ये मग्न असतात.
३- आऊट आॅफ शेप ट्रेनर- जो ट्रेनर स्वत:च फिट नसेल, त्याच्या आकाराकडे पाहूनच जर आपल्याला कळत असेल, की हा माणूस फिट नाही, तर त्याच्याकडून आपल्याला काय मोटिव्हेशन मिळणार आणि तो काय शिकवणार? आपलाही त्यामुळे डिसमूड होतोच...
अयोग्य ट्रेनर्सचे हे काही प्रकार.. आणखी काही प्रकार पाहू या पुढच्या भागात..

Web Title:  How to choose your fitness trainer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.