home remedy to get rid of hand skin peeling | हाताला स्कीन पीलिंगचा त्रास होत असेल तर 'हे' उपाय करा!
हाताला स्कीन पीलिंगचा त्रास होत असेल तर 'हे' उपाय करा!

आपले हात म्हणजे आपल्या शरिराचा असा अवयव ज्यामुळे आपण अनेक गोष्टींच्या संपर्कात येतो. परंतु बऱ्याचदा आपले त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. अनेकदा आपल्याला हाथ धूण्यासाठी सांगण्यात येते. पण हातांचे आरोग्य राखण्यासाठी एवढे करणे पुरेसे नाही. हातांकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे स्कीन पीलिंग म्हणजेच हाताची त्वचा निघण्याचा त्रास होतो. त्यामुळे हाताला वेदना होत नसल्या तरीदेखील अनेक गोष्टी हाताळताना त्यामुळे त्रास होऊ शकतो. योग्य वेळी घरगुती उपचार घेतले तर हे बरे होण्यास मदत होते. याकडे दुर्लक्ष केले तर अॅलर्जी होण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात यावर उपचार करण्यासाठी काही घरगुती टिप्स...

गरम पाण्यात हात भिजवा

एका भांड्यामध्ये कोमट पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये आपल्या हातांना दररोज दहा मिनिटांपर्यंत बुडवून ठेवा. असे करण्यामुळे त्वचा मऊ होते. तुम्ही पाण्यामध्ये मध किंवा लिंबाचा रसही टाकू शकता.

विटामिन 'ई' तेलाने मालिश करा

आपले हात कोमट पाण्यामध्ये १० ते १५ मिनिटांपर्यंत बुडवून ठेवा आणि पुसून घ्या. हात पुसण्यासाठी एका मुलायम कपड्याचा वापर करा. त्यानंतर हातावर मालिश करण्यासाठी व्हिटॅमिन ई तेलाचा वापर करा. व्हिटॅमिन ईमुळे हात खुप काळापर्यंत मॉईश्चराईज राहण्यास मदत होईल. 

ओट्स

थोडे ओट्स घ्या आणि गरम पाण्यामध्ये भिजवा. ते पाण्यामध्ये पुर्णपणे भिजल्यानंतर त्या भांड्यामध्ये १० ते १५ मिनिटे हाथ बुडवून ठेवा. त्यानंतर साफ पाण्याने हात धुवून ते पुसून घ्या. त्यानंतर मॉइश्चराईजरचा वापर करू शकता. जर स्कीन पीलिंग मोठ्या प्रमाणावर होत असेल तर हो उपाय तुम्ही रोज करू शकता. 

काकडी

काकडी हाताच्या त्वचेला नरम आणि सुंदर बनवण्यासोबतच स्किन पिलिंगवरही उत्तम उपाय आहे. काकडीचा एक मोठा तुकडा घ्या. त्याने आपल्या हातावर मसाज करून १० ते १५ मिनिटे त्याचा रस त्वचेवर तसाच राहू द्या. त्यानंतर हलक्या गरम पाण्याने हात धुवा आणि व्हिटॅमिन ईच्या तेलाने मालिश करा. 

कोरफड

रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर किंवा जेल हातांना लावावे. सकाळी उठल्यावर हलक्या कोमट पाण्याने हात धुवावे. हाताची त्वचा मऊ होते.


Web Title: home remedy to get rid of hand skin peeling
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.