'ही' आहेत रक्त कमी होण्याची कारणं आणि लक्षणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 01:11 PM2019-01-21T13:11:39+5:302019-01-21T13:17:19+5:30

आपल्या देशातील अनेक नागरिक शरीरातील रक्ताच्या कमतरतेला सामोरं जात आहेत. यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Hemoglobin deficiency in human body or pregnancy know the symptoms and reasons | 'ही' आहेत रक्त कमी होण्याची कारणं आणि लक्षणं!

'ही' आहेत रक्त कमी होण्याची कारणं आणि लक्षणं!

googlenewsNext

आपल्या देशातील अनेक नागरिक शरीरातील रक्ताच्या कमतरतेला सामोरं जात आहेत. यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एका सर्वेमधून समोर आल्यानुसार, आपल्या देशामध्ये जवळपास 60 टक्के लोकं असे आहेत, जे शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करत आहेत. यामध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. महिलांच्या शरीराचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी आयर्नची गरज जास्त असते. गरोदरपणात तर ही गरज आणखी वाढते. परंतु, त्यांना आवश्यक ते पोषण न मिळाल्याने शरीरात रक्ताची कमतरता उद्भवते. शरीरामध्ये उद्भवणाऱ्या रक्ताच्या कमतरतेला एनीमिया असं म्हटलं जातं. शरीरातील लोह तत्वांच्या कमतरतेुळे अनेक व्यक्ती एनिमियाच्या शिकार होतात. म्हणून अनेकदा डॉक्टर आयर्नयुक्त पदार्थांचा आहारत समावेश करण्याचा सल्ला देतात. अनेकदा लोक एनीमियाच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. असं करणं जीवावरही बेतू शकतं. जाणून घेऊया शरीरातील रक्ताची पातळी कमी होण्याच्या कारणांबाबत...

शरीरातील रक्ताची कमतरता होण्याची कारणं :

शरीरामध्ये आयर्नच्या कमतरतेमुळे रक्ताची पातळी कमी होऊ शकते. पौष्टिक पदार्थांचं सेवन न करणं आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन न करणं हे त्यामागील मुख्य कारण आहे. जर शरीराला आवश्यक तेवढं जेवण नाही मिळालं तर शरीरामध्ये रक्ताची कमतरता दिसून येते. वाढत्या वयाच्या मुलांमध्ये जेव्हा शरीराला पूर्ण पोषक आहार मिळत नाही त्यावेळी आयर्नची कमतरता भासते. याव्यतिरिक्त महिलांना मासिक पाळीदरम्यान अधिक रक्तस्राव झाल्यामुळे रक्ताच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे, एखादा अपघात, टीबी, हाडांचा ट्यूमर यांसारख्या आजारांमुळे रक्ताच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. आयर्नच्या कमतरतेमुळे रक्ताच्या पेशी पिवळ्या आणि कमजोर होतात. ज्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन व्यवस्थित प्रवाहित होऊ शकत नाही. याचा सरळ परिणाम आपल्या बॉडि रूटीनवर होतो. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीराचं कार्य कमी होतं. 

रक्ताच्या कमतरतेची लक्षणं :

- रक्ताच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच अनिद्रा, डोळ्यांची दृष्टी कमी होण्याचीही समस्या उद्भवते. 

- रक्ताच्या कमतरतेचा सामना कराणाऱ्या व्यक्तीला अनेकदा थकवा जाणवतो. 

- रक्ताच्या कमतरतेमुळे त्वचा पिवळसर दिसू लागते. तसेच ओठ आणि नखांचा रंगही बदलून जातो. 

- थोडसंही चालल्यावर धाप लागते आणि छातीत वेदना होण्यास सुरुवात होते. 

गरोदरपणात उद्भवणारी रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी काही टिप्स :

पुरूषांपेक्षाही अनेक महिलांमध्ये रक्ताची कमतरता आढळून येते. गरोदरपणात जर शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाली तर थकवा, कमजोरी, श्वसनाचे विकार, नखं आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. एवढचं नव्हे तर यामुळे पोटातील बाळालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जेव्हा एखादी महिला गरोदर असते, त्यावेळी तिच्या शरीरातील रक्त पातळं होतं आणि त्याचबरोबर हिमोग्लोबिनची पातळीही कमी होते. गरोदरपणात असं होणं सामान्य गोष्ट आहे. परंतु जर हिमोग्लेबिनची पातळी 9 पेक्षाही कमी झाली तर ही चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे गर्भवती महिलांना अतिरिक्त आयर्नची गरज लागते. त्यामुळे त्यांना आपल्या आहारावर लक्ष देणं गरजेचं असतं. आहारावर लक्ष दिल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करता येते. 

Web Title: Hemoglobin deficiency in human body or pregnancy know the symptoms and reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.