मायग्रेनच्या डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या गोष्टींचे करा सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 11:07 AM2018-05-26T11:07:34+5:302018-05-26T11:07:34+5:30

कधी कधी तर या वेदना असह्य होतात. या आजाराचं उपचार नसले तरी याचा त्रास कमी केला जाऊ शकतो.

Health Tips : Foods that help to get rid of migraine | मायग्रेनच्या डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या गोष्टींचे करा सेवन

मायग्रेनच्या डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या गोष्टींचे करा सेवन

Next

मायग्रेन ही एक गंभीर समस्या असून हा त्रास जास्त ताण, झोप पूर्ण न होणे यामुळे होतो. ज्या लोकांना मायग्रेनची समस्या असते त्यांचं डोकं खूप दुखतं. खासकरुन त्यांचं अर्ध डोकं दुखतं. सतत अशाप्रकारचा त्रास होतो. कधी कधी तर या वेदना असह्य होतात. या आजाराचं उपचार नसले तरी याचा त्रास कमी केला जाऊ शकतो.

या त्रासाला दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्याच्या गोष्टींची काळजी घेणे आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागेल. धावपळ, कामाच्या तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी रिबोफ्लेविन

शोधकर्त्यांनुसार, रिबोफ्लेविन किंवा व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाल्ले तर मायग्रेनचा त्रास कमी करण्यास मदत मिळते. हे खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते. यासोबतच शरीरातील सेल्स निकामी होण्यापासून वाचवण्यातही याची मदत होते. महिलांनी आपल्या डाएटमध्ये रोड साधारण 1.1 मिली ग्रॅम तर पुरुषांनी रोज 1.2 मिली ग्रॅम रिबोफ्लेविनचा समावेश करायला हवा.  

कोणत्या गोष्टींमधून मिळतं रिबोफ्लेविन?

कलेजी, दूध, दही, मशरुम, पालक, बदाम, टोमॅटो, अंडी या पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात रिबोफ्लेविन असतात. 

Web Title: Health Tips : Foods that help to get rid of migraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.