'या' 4 प्रश्नांवरून जाणून घ्या; तुम्ही हेल्दी आहात की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:55 PM2019-03-04T17:55:35+5:302019-03-04T17:57:19+5:30

सध्याच्या धावपळीच्या दिनक्रमामध्ये स्वतःसाठी वेळ देणं फार कठिण असतं. यामुळे सर्वात जास्त नुकसान ज्या गोष्टीचं होतं ती म्हणजे आपलं आरोग्य...

Health related questions which shows how healthy a person is | 'या' 4 प्रश्नांवरून जाणून घ्या; तुम्ही हेल्दी आहात की नाही?

'या' 4 प्रश्नांवरून जाणून घ्या; तुम्ही हेल्दी आहात की नाही?

googlenewsNext

सध्याच्या धावपळीच्या दिनक्रमामध्ये स्वतःसाठी वेळ देणं फार कठिण असतं. यामुळे सर्वात जास्त नुकसान ज्या गोष्टीचं होतं ती म्हणजे आपलं आरोग्य... अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की, बीझी असल्यानंतरही त्यांना आरोग्याच्या कोणत्याच समस्यांचा सामना करावा लागला नाही. परंतु, आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असाच समज असतो आणि हाच त्यांचा सर्वात मोठा गैरसमज असतो. आज आम्ही तुम्हाला काही अशा प्रश्नांबाबत सांगणार आहोत, ज्यांची उत्तरं जर नाही अशी असतील तर तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्षं करणं अत्यंत महागात पडू शकतं. 

तुम्ही दररोज एक्सरसाइज करता का?

दररोज 60 मिनिटांचा वेळ आपल्यासाठी काढा. 45 मिनिटं एक्सरसाइज (ब्रिस्क वॉक, सायकलिंग, स्ट्रेचिंग, वेट लिफ्टिंग इत्यादी) करा. 15 मिनिटं डीप ब्रिदिंग आणि मेडिटेशन करा. 

तुम्ही पुरेशी झोप घेता का?

दररोज 7 तास झोपणं अत्यंत आवश्यक असतं. झोपण्याची उत्तम वेळ म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत. यावेळेदरम्यान झोपणं शक्य होत नसेल तर प्रयत्न करा की, निदान एका ठराविक वेळेतच झोप पूर्ण कराल. यामुळे शरीर आणि मन कन्फ्यूज होत नाही आणि झोपही चांगली येते. 

तुम्ही शरीराला आवश्यक तेवढं पाणी पिता का?

दररोज कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी पिण आवश्यक असतं. जेवताना पाणी पिणं टाळा.  जेवणाआधी जवळपास अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिणं फायदेशीर ठरतं. यामुळे आपण जेवण कमी प्रमाणात करतो. जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या. याआधी जर तहान लागलीच तर घोटभर पाणी प्या. त्यापेक्षा जास्त पाणी पिणं टाळा. 

(Image Credit : Verywell Fit)

तुम्ही दीर्घ श्वास घेता का?

दिवसभरामध्ये जेव्हाही लक्षात येइल तेव्हा दीर्घ श्वास घेण्यास विसरू नका. डीप ब्रीदिंगमुळे आपल्या सेल्समध्ये जास्त ऑक्सिजन पोहोचतो आणि आपलं डोकं शांत राहण्यासही मदत होत. 5 मिनिटांची डीप ब्रीदिंग आपल्याला रिलॅक्स करून कमीतकमी दोन तासांसाठी फ्रेश करते. 

Web Title: Health related questions which shows how healthy a person is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.