HEALTH: Men will not be consumed every day with 'tomato' disease! | HEALTH : ​रोज टोमॅटोच्या सेवनाने पुरुषांना होणार नाही 'हा' आजार !

प्रत्येकाच्या आहारात कमी-अधिक प्रमाणात टोमॅटोचा समावेश असतो. टोमॅटोमुळे खाद्यपदार्थांना स्वाद येतो हेच आपणास माहित असेल मात्र एका नव्या संशोधनानुसार जे पुरुष रोज टोमॅटोचे सेवन करतात, त्यांच्यात निम्म्यापेक्षा जास्त स्किन कॅन्सरचा धोका कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
 
संशोधनात न्यूट्रिशनल इंटरवेंशन स्किन कॅन्सरचा धोका कशाप्रकारे कमी करतो, याबाबत सविस्तर मांडण्यात आले आहे. संशोधनादरम्यान पुरुषांच्या आहारात ३५ आठवड्यापर्यंत संपूर्ण आहाराच्या १० टक्के टोमॅटो पावडर दिले गेले आणि त्यांना त्यानंतर उन्हात सोडले गेले. संशोधनात टोमॅटो न सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत सुमारे ५० टक्के पुरुषांमध्ये स्किन कॅन्सरचा धोका कमी झाल्याचे आढळले.  

यू.एस.च्या ओहिओ स्टेट यूनिवर्सिटी जेसिका कोपरस्टोनचे म्हणण्यानुसार टोमॅटो आणि कॅन्सरचा ताळमेळ असा आहे की, टोमॅटोला रंग देणारे एलीमेंट्स डायटरी कॅरोटिनॉयड्स स्किनला अल्ट्रावॉयलेट रेजपासून बचाव करतात.  

याअगोदर टोमॅटोवर झालेल्या संशोधनानुसार, टोमॅटो पेस्ट सेवन केल्याने सनबर्न कमी होतो कारण त्यात कॅरोटिनॉयड्स आढळतात, जे पुरुषांच्या स्किनमध्ये जमा होतात, ज्यामुळे अल्ट्रावॉटलेट लाइट्सपासून संरक्षण करतात.  

टोमॅटोत लायकोपीन, प्रायमरी कॅरोटिनॉयड्स आहेत जे सर्वात जास्त फायदेशीर अ‍ॅन्टीआॅक्सीडेंट आहेत. संशोधक कॉपरस्टोन लायकोपीन शिवाय आता टोमॅटोच्या कंपाऊड्सवर संशोधन करीत आहेत. आणि हे संशोधन पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.  
 
टोमॅटोतील फायदेशीर तत्त्वांमुळे चेहऱ्याचे सौंदर्यही खुलण्यास मदत होते. टोमॅटोच्या सेवनाने किंवा टोमॅटोचा रस चेहऱ्याच्या त्वचेवर लावल्यास त्वचेचा रंग तर उजाळतोच शिवाय वृद्धापकाळाची चिन्हे दिसत नाही म्हणजेच त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.  

Also Read : ​Beauty : ​चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर !
                   : ​BEAUTY TIPS : ​चेहऱ्यावर टोमॅटो घासल्याने खुलते सौंदर्य !

Web Title: HEALTH: Men will not be consumed every day with 'tomato' disease!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.