फिट आणि हेल्दी राहण्यासाठी रोज खावे मोड आलेले मूग 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 10:33 AM2018-05-16T10:33:09+5:302018-05-16T10:33:09+5:30

धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळेलच असं नाही. अशात हे आजारपण कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य हा एक उपाय आहे. 

Health Benifits of eating sprouts | फिट आणि हेल्दी राहण्यासाठी रोज खावे मोड आलेले मूग 

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी रोज खावे मोड आलेले मूग 

googlenewsNext

(Image Credit: Dr. Health Benefits)

मुंबई: आजच्या रोजच्या धावपळीच्या आणि फास्टफूडच्या जीवनात प्रत्येकालाच काहीना काही आरोग्यादायक समस्या भेडसावत असतात. काही लोक याकडे दुर्लक्ष करतात तर काही याबाबत सजग दिसतात. बाहेरच्या तेलकट आणि जंकफूडमुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो आहे. खासकरुन अनेकांना वाढत्या वजनाने हैराण करुन सोडले आहे. धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळेलच असं नाही. अशात हे आजारपण कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य हा एक उपाय आहे. 

- मोड आलेल्या मुगामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. तसंच रक्त शुद्ध व्हायला मदत होते. फळं आणि भाज्यांमध्ये मिळतं त्यापेक्षा 100 पट जास्त एंजाईम तुम्हाला मोड आलेले मूग किंवा चणे खाल्यामुळे मिळतं. 

- मोड आलेले मूग आणि चणे खाल्ल्यामुळे पचन संस्थाही चांगली होते. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीर चांगलं काम करतं. मोड आलेले मूग आणि चण्यांमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात. चेहऱ्याचे अनेक विकार काही दिवसात यामुळे दूर होतील.

- या कडधान्यांचे एवढे फायदे असले तरी अनेकांना ती नुसती खायला आवडत नाहीत. त्यामुळे त्याला सॅलड बनवूनही तुम्ही खाऊ शकता. पण लक्षात ठेवा मोड आलेल्या या कडधान्यांना शिजवलं किंवा तळलं तर त्यामधली पोषक तत्त्व निघून जातात. त्यामुळे ही कडधान्य उकडून सॅलडसारखीच खा. 

- या कडधान्यांना तुम्ही टोमॅटो, कांदा आणि काकडीबरोबरही खाऊ शकता. तसंच त्यामध्ये गरजेनुसार मीठ आणि चाट मसाला टाकून तुम्ही त्याला आणखी चविष्ट बनवू शकता. 
 

Web Title: Health Benifits of eating sprouts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.