नाश्त्याला उडदाच्या डाळीची खिचडी खा, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 09:55 AM2018-09-12T09:55:19+5:302018-09-12T09:58:57+5:30

काळी उडदाची डाळ ही सर्व डाळींमध्ये सर्वाधिक पोषक असते. डाळ भाजी करण्यासोबतच तुम्ही खिचडी तयार करण्यासाठीही वापरु शकता. 

Health benefits of black gram or Urad dal khichdi | नाश्त्याला उडदाच्या डाळीची खिचडी खा, मग बघा कमाल!

नाश्त्याला उडदाच्या डाळीची खिचडी खा, मग बघा कमाल!

googlenewsNext

उडदाची डाळ केवळ चवीलाच चांगली नसते तर तिचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. उडदाची डाळ दोन प्रकारची असते एक पांढरी आणि एक काळी. काळी उडदाची डाळ ही सर्व डाळींमध्ये सर्वाधिक पोषक असते. डाळ भाजी करण्यासोबतच तुम्ही खिचडी तयार करण्यासाठीही वापरु शकता. 

उडदाच्या डाळीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी थायमीन, रायबोफ्लेविन, नियासीन, व्हिटॅमिन सी, आयर्न, कॅल्शिअमसोबत सर्वच आवश्यक पोषक तत्व असतात. या डाळीची खिचडी खाल्याने पचनक्रिया चांगली होते. चला जाणून घेऊन सकाळी नाश्त्याला उडद डाळीची खिचडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे....

१) कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत

सकाळी नाश्त्यामध्ये उडदाच्या डाळीची खिचडी खाल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. यातून भरपूर प्रमाणात मग्नेशिअम आणि फोलेट मिळतात, याने नसांमध्ये ब्लॉकेज होत नाहीत. मॅग्नेशिअम हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं, कारण याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. ( हे पण वाचा : त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी पालक ठरते गुणकारी!)

२) पचनक्रिया राहते चांगली

जर तुम्हाला नेहमीच पोटाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत असेल तर उडदाच्या डाळीची खिचडी खाणे सुरु करा. या डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतं, याच्या नियमीत सेवनाने पचनक्रिया चांगली होते आणि पोटाच्या समस्या दूर होतात. 

३) प्रोटीनचा भांडार

मांसपेशींच्या विकासात प्रोटीनची महत्त्वाची भूमिका असते. जर तुम्ही शाकाहारी असाल तर उडीद डाळ तुमच्यासाठी प्रोटीन मिळवण्याचं बेस्ट ऑप्शन आहे. प्रोटीन त्वचा, ब्लड, मसल्स आणि हाडांच्या पेशींचा विकास करण्यासाठी महत्त्वाचं आहे. ( हे पण वाचा : पुरुषांना किती प्रमाणात पोषक तत्वांची गरज असते?)

४) आयर्नची कमतरता भरून निघेल

आयर्नची कमतरता असेल तर उडीद डाळ आयर्नचा चांगला स्त्रोत आहे. हे खाल्याने शरीराला ताकद मिळते. मासिक पाळी असताना महिलांनी उडीद डाळ आवर्जून खावी, कारण या दिवसात आयर्नची कमतरता होते. 

५) डायबिटीजच्या रुग्णांसाठी बेस्ट

उडीद डाळीतून मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं. त्यामुळे ही डाळ डायबिटीजच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे. त्यासोबतच याने ब्लडमधील इन्सुलिन आणि ग्लूकोजची लेव्हलही नियंत्रणात ठेवते. 

Web Title: Health benefits of black gram or Urad dal khichdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.