डायबिटीजमध्ये वाढणाऱ्या वजनावर रामबाण उपाय आहे भेंडीचं पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 02:17 PM2019-02-19T14:17:55+5:302019-02-19T14:20:17+5:30

मधुमेह म्हणजेच डायबिटीज... सध्या लहानग्यांपासून अगदी थोरामोठ्यांना भेडसावणारी समस्या. अनेकांना ही नॉर्मल समस्या वाटते आणि त्यामुळे ती लोक याकडे दुर्लक्ष करतात.

This green water can cure diabetes weight gain problem naturally | डायबिटीजमध्ये वाढणाऱ्या वजनावर रामबाण उपाय आहे भेंडीचं पाणी!

डायबिटीजमध्ये वाढणाऱ्या वजनावर रामबाण उपाय आहे भेंडीचं पाणी!

Next

मधुमेह म्हणजेच डायबिटीज... सध्या लहानग्यांपासून अगदी थोरामोठ्यांना भेडसावणारी समस्या. अनेकांना ही नॉर्मल समस्या वाटते आणि त्यामुळे ती लोक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही समस्या जीवघेणी ठरू शकते. पण वेळीच जर यावर उपचार घेतले तर डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळू शकते. खरं तर यावर उपचार करताना डॉक्टर अनेक प्रकारची औषधं घेण्याचा सल्ला देतात. पण आहारात केलेले बदल आणि काही घरगुती उपायही डायबिटीजवर परिणामकारक ठरतात. अनेकदा डॉक्टरच चांगलं आणि हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला देत असतात. 

डायबिटीजच्या रूग्णांसाठी हेल्दी डाएट घेणं अत्यंत आवश्यक असतं. गोड पदार्थांव्यतिक्त जे पदार्थ डायबिटीज वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. अशा पदार्थांपासून दूर राहणं फायदेशीर ठरतं. याशिवाय रोजच्या रूटिनमध्ये व्यायामाचा समावेश करणंही उत्तम ठरतं. पण याशिवाय असे काही घरगुती उपाय आहेत, जे डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घरगुती उपायाबाबत सांगणार आहोत तो म्हणजे, भेंडीपासून तयार केलेलं पाणी डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. जाणून घ्या कसं तयार करतात भेंडीचं पाणी...

भेंडीचं पाणी तयार करण्याची पद्धत :

भेंडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक असणारे गुणदर्मही आढळून येतात. भेंडी खाल्याने डायबिटीज ठिक होतं. परंतु तज्ज्ञांच्या मते भेंडीचं पाणी प्यायल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. जाणून घेऊयात भेंडीचं पाणी तयार करण्याची पद्धत...

- सर्वातआधी 4 भेंड्या घेऊन त्या व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घ्या.

- आता मधून कापून भेंडीचे दोन तुकडे करा. 

- आता एका जारमध्ये तीन ग्लास पाणी घ्या.

- त्या पाण्यामध्ये भेंडीचे तुकडे टाकून रात्रभर तसेच ठेवा.

- सकाळपर्यंत भेंडीचे हे तुकडे पाण्यामध्ये स्मॅश करून पाण्यातून काढून टाका.

- आता हे पाणी सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा प्या.

असं काम करतं भेंडीचं पाणी :

भेंडीमध्ये सर्वात कमी कॅलरी असतात. 100 ग्रॅम भेंडीमध्ये 33 कॅलरी असतात. याव्यतिरिक्त भेंडीचं सेवन केल्याने वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतं. ज्यामुळे गोड आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते. 

मधुमेह किंवा डायबिटीजचे दोन प्रकार :

मधुमेहाचे दोन प्रकार असतात. एक टाइप वन आणि दुसरं टाइप टू डायबिटीज. टाइप वन डायबिटीजचा प्रकार लहान मुलांमध्ये आढळून येतो. शरीरातील वीटासेल डॅमेज झाल्यामुळे लहान मुलांना हा आजार होतो. अशा मुलांना आयुष्यभर इन्सुलिनचं सेवन करावं लागतं. टाइप टू डायबिटीज प्रौढ व्यक्तींमध्ये आढळून येतो. परंतु आता डायबिटीज रूग्णांमध्ये तरूणांचीही संख्या वाढत आहे.

मधुमेहामुळे खालील समस्यांचा सामना करावा लागू शकतो :

सतत भूक आणि तहान लागणं

सतत लघवीला होणं

थकवा येणं

डोळ्यांच्या समस्या किंवा दृष्टी कमी होणं

त्वचेला इन्फेक्शन होणं
 
असा करा बचाव :

गोड पदार्थांचं सेवन टाळा.

तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाणं टाळा.

दर दोन तासांनी थोडं थोडं खाणं आवश्यक. 

रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत रहा.

व्यायाम करा. 

Web Title: This green water can cure diabetes weight gain problem naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.