Fitness: This is Malaika Arora's fitness and beauty secret! | Fitness : ‘हे’ आहे मलाइका अरोडाचे फिटनेस आणि सौंदर्याचे गुपित !

‘चल छैंय्या-छैंय्या’ आणि ‘बदनाम मुन्नी’ म्हणजेच ‘दबंग’ फेम मलाइका अरोडा खानला पाहून असे वाटत नाही की, ती दोन मुलांची आई असेल. तिची फिगर आणि सौंदर्यापुढे सध्याच्या अभिनेत्र्या फिक्या पडतात. तिला पाहून प्रत्येक आईला हेवा वाटेल की, प्रेग्नन्सीनंतरही मलाइकाने एवढी चांगली फिगर कशी मेंटेन केली असेल. 

Related image

चला जाणून घेऊया मलाइकाच्या फिटनेस आणि सौंदर्याचे गुपित...

असे म्हणतात की, नाश्ता राजासारखा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि डिनर एका गरीब व्यक्तीसारखे असावे. मात्र मलाइका असा कोणताही प्रकारचा डायट फॉलो नाही करत मात्र आहार नेहमी पौष्टिक असावा असे ती मानते.  

मलाइका सकाळी लिंबू आणि मधासोबत एक ग्लास कोमट पाणी पिते, नाश्त्यामध्ये ऋतूमानानुसारच्या फळांसोबत इडली, उपमा, पोहा आदी सेवन करते.  
दुपारी १२ आवळ्यांसोबत १ ग्लास व्हेजिटेबल ज्यूस आणि ब्राऊन टोस्टसोबत एका अंड्यातील पांढऱ्या बलकाचे आमलेट खाते. 
रात्रीच्या जेवनात ब्राउन किंवा राइस, २ ते ३ प्रकारचे व्हेजिटेबल, चिकन किंवा फिश आणि सलाद सेवन करते. 
 
रात्रीच्या जेवनानंतर कधी भूक लागलीच तर १ संत्री, गाजर किंवा अन्य फळ किंवा अंजीर, बदाम आदीचे सेवन करते. शिवाय फिट राहण्यासाठी आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस दिड-दिड तास जिममध्ये वर्क आऊट करते. शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होण्यासाठी मलाइका जिममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्क आऊट करते.  

Also Read :   go crazy : ​मलायका अरोराचे फिटनेस अ‍ॅप येणार!
                   : ​Health : ​फक्त फिट दिसणे नव्हे तर स्वस्थही असायला हवे -यामी गौतम !

 
Web Title: Fitness: This is Malaika Arora's fitness and beauty secret!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.