Fitness: If you want to be 'Fit and Fine' then read it exactly! | Fitness : ​'फिट अ‍ॅण्ड फाइन' राहायचे असेल तर हे नक्की वाचा !

-रवींद्र मोरे                  
सेलिब्रिटींचा विचार केला तर त्या आपल्या आरोग्याबाबत नेहमी सतर्क असतात. फिटनेस आणि सौंदर्य टिकविण्यासाठी त्या नियमित व्यायाम, योगा तसेच डायटचा आधार घेतात. मात्र काही महिला स्वत:च्या आरोग्याकडे अपेक्षित लक्ष देत नसल्याने भविष्यात याचा परिणाम त्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर दिसून येतो.

सदर महिला पती आणि मुलांची पूर्णत: काळजी घेतात, मात्र स्वत:ला फिट ठेवण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नसतो. यासाठी आम्ही आपणास आपल्या फिटनेससाठी काही सोपे उपाय सांगत आहोत.  

महिलांनी फिट राहण्यासाठी आणि स्वत:चे सौंदर्य टिकविण्यासाठी हिरव्या भाजीपालांचा आहारात समावेश करावा. यामुळे आपणास हेल्दी लाइफ मिळण्यास मदत होईल. बऱ्याच महिला बाह्य सौंदर्य खुलविण्यासाठी डायटिंगचा आधार घेतात. मात्र त्यांची ही धारणा साफ चुकीची आहे, कारण केवळ स्लिम दिसणे म्हणजे फिटनेस नव्हे. बाह्य शारीरिक सौंदर्याबरोबरच आतून आपले शरीर फिटदेखील असावे. यासाठी प्रत्येक महिला आणि मुलींनी हिरवा भाजीपाला जसे पालक, मेथी, पत्ताकोबी, मोहरी, बीट, सलाद आणि अन्य ऋतूमानानुसार भाज्यांचा प्रयोग करावा. यांच्यात केरोटीनॉइड्सदेखील आढळतात, जे अ‍ॅन्टिआॅक्सिडेंट्स आहेत. अ‍ॅन्टिआॅक्सिडेंट्स आपल्या शरीराला रोगांपासून लढण्याची क्षमता प्रदान करतात.  

संशोधनानुसार, अपुरी झोप वजन वाढण्याचे एक कारण असू शकते. झोपे अभावी तणावाची परिस्थिती निर्माण होते आणि यामुळे तणावाशी संबंधीत हार्मोन शरीरात अधिक पाणी वाढवतात, ज्या कारणाने वजन वाढलेले दिसते. एवढेच नव्हे तर अपुऱ्या झोपेमुळे आपण व्यवस्थित वर्क आऊटदेखील करु शकत नाही.   
  
* वाढलेले वजन कमी करुन फिट अ‍ॅण्ड फाइन राहण्यासाठी आहार कसा असावा. 

- पत्ताकोबीमध्ये चरबी कमी करणारे गुण असल्याने दररोज पत्ताकोबीचे ज्यूस घ्यावे. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य राहते.

- पपईचे सेवन केल्याने कंबरेवरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते म्हणून नियमित पपई खा. 

- दह्याचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घरातच तयार करण्यात आलेले ताक प्यावे. त्यामध्ये स्वादानुसार थोडेसे काळे मीठ आणि हिंग-जीरा पावडर टाकू शकता. 

- वजन कमी करण्यासाठी कारलेदेखील उपयुक्त आहे. यासाठी कारल्याची अर्धवट कच्ची भाजी सेवन करावी. 

- आवळा आणि हळद समान प्रमाणत घेऊन बारीक चूर्ण तयार करा. ताकामध्ये हे चूर्ण टाकून घेतल्यास कंबर बारीक होईल.  
           
- वजन कमी करण्यासाठी एक चमचा पुदिन्याच्या रसामध्ये २ चमचे मध मिसळून तयार केलेले मिश्रणही घेऊ शकता. 

- लाल तिखटातील कॅप्सासिन नावाचा घटकी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे संशाधकांनी दावा केला आहे. हा घटक वेदनाशामक म्हणूनही फायदेशीर ठरतो.

- गाजराच भरपूर सेवन केल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. 

- सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्यानेही फायदा होतो.

Also Read : ​HEALTH : वजन कमी करण्यासाठी हा आहे खास शाकाहारी डायट प्लॅन !
                   : ​​Fitness : स्लिम आणि फिट राहण्यासाठी करा भरपूर नाश्ता !

Web Title: Fitness: If you want to be 'Fit and Fine' then read it exactly!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.