तुमचं आयुष्य कमी करतीये तुमची 'ही' सवय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 11:54 AM2019-05-02T11:54:29+5:302019-05-02T11:59:21+5:30

जर मोबाइलपासून जरा वेळही दूर राहू शकत नसाल आणि  मोबाइलचा फार जास्त वापर केल्यावर ही सवय मोडण्याचा विचार करत असाल तर यावर लगेच काम सुरू करा.

Excess use of phone may lead to serious health problems and threat to life | तुमचं आयुष्य कमी करतीये तुमची 'ही' सवय!

तुमचं आयुष्य कमी करतीये तुमची 'ही' सवय!

Next

जर मोबाइलपासून जरा वेळही दूर राहू शकत नसाल आणि  मोबाइलचा फार जास्त वापर केल्यावर ही सवय मोडण्याचा विचार करत असाल तर यावर लगेच काम सुरू करा. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जेवढा जास्त वेळ आपण स्मार्टफोनवर घालवतो त्याने आपली झोप, सेल्फ स्टीम, रिलेशनशिप, स्मरणशक्ती, अलर्टनेस, क्रिएटिव्हीटी, प्रॉडक्टिव्हिटी किंवा एखादी समस्या सोडवण्याचा निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होत आहे. 

(Image Credit : Wired)

त्यासोबतच स्मार्टफोनचा वापर कमी करण्याचं एक मुख्य कारण म्हणजे स्मार्टफोनच्या अधिक वापराने तुमचं आयुष्य कमी होत आहे. स्मार्टफोनने आपल्या शरीराचा स्ट्रेस वाढवणारा कॉर्टिसोल हार्मोन्सचं प्रमाण वाढत आहे. कॉर्टिसोल आरोग्यासाठी तर हानिकारक आहेच, सोबतच याने व्यक्तीचं आयुष्यही कमी होत आहे. 

वाढत आहे फोनची सवय

फोनच्या जास्त वापराचं केंद्र डोपामीन हे राहिलं आहे. हे केमिकल सवयी लावणे आणि सवयी वाढवणे यासाठी असतं. अनेक एक्सपर्ट्सचं असं मत आहे की, डोपामीनमुळेच आपण फोनच्या आहारी जात आहोत, त्यामुळेच फोनची सवय लागत आहे. तर फोनमुळे आपल्यात स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलचं प्रमाण वाढणं घातक आहे. 

(Image Credit : Daily Mail)

कॉर्टिसोल एक असा हार्मोन आहे ज्यानने शरीरात अचानक झालेल्या एखाद्या प्रक्रियेपासून आपला बचाव करतं. जसे की, ब्लड प्रेशर, हार्ट रेट किंवा ब्लड शुगर वाढल्यावर. पण आपलं शरीर तणावाच्या स्थितीतही कॉर्टिसोल रिलीज करतं. उदाहरणार्थ तुम्ही बॉसचा मेल चेक करण्यासाठी फोन बघता. प्राध्यापक डेव्हिड ग्रीनफिल्ड सांगतात की, जर फोन तुमच्या आजूबाजूला असेल आणि त्याचा आवाज ऐकू आता तर तुमच्यात कॉर्टिसोलचं प्रमाण वाढतं. 

जीवघेणं ठरू शकतं कॉर्टिसोलचं प्रमाण

असं झाल्यावर भलेही तुम्हाला थोडावेळ चांगलं वाटतं, पण याचे परिणाम नंतर घातक ठरू शकतात. जेव्हाही तुम्ही फोन हाती घेता तेव्हा काहीना काही स्ट्रेस देणाऱ्या गोष्टी तुमची वाट बघत असतात. त्याने तुमचं कॉर्टिसोल वाढतं, मग तुम्ही काही चेक करता आणि मग पुन्हा तुमचं मन फोन चेक करण्याचं होतं. 

(Image Credit : NPR)

ही सायकल अशीच सुरू राहते. याने लागोपाठ कॉर्टिसोलचं प्रमाण वाढतं आणि कॉर्टिसोलचं प्रमाण वाढत राहिल्याने डिप्रेशन, जाडेपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम, टाइप २ डायबिटीज, फर्टिलिटी समस्या, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डिमेंशिया आणि स्ट्रोकसारक्या समस्या होऊ शकतात.

Web Title: Excess use of phone may lead to serious health problems and threat to life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.