'हे' आहेत रात्री उशिरा जेवण्याचे साइड इफेक्ट्स; लगेच बदला सवय 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:27 PM2019-04-18T16:27:08+5:302019-04-18T16:32:54+5:30

काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही.

Effects of late night dinner on health change this habit | 'हे' आहेत रात्री उशिरा जेवण्याचे साइड इफेक्ट्स; लगेच बदला सवय 

'हे' आहेत रात्री उशिरा जेवण्याचे साइड इफेक्ट्स; लगेच बदला सवय 

googlenewsNext

(Image Credit : Naturally Savvy)

काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? रात्री उशीरा जेवलं तर सकाळी तुमचा मूड फ्रेश राहत नाही. ऑफिसचं काम करतानाही तुम्ही एनर्जेटिक नसता. अशातच गरजेचं आहे की, रात्री भरपूर झोप घेण्याइतकचं शांत झोप घेणंही आवश्यक असतं. जर तुम्ही दररोज रात्री उशीरा जेवत असाल तर तुम्हाला शरीराच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

(Image Credit : Men's Health India)

रात्री योग्य वेळी न जेवल्याने होणारा त्रास :

शांत झोप न लागणं 

पूर्ण दिवस थकल्यानंतर जर तुम्हाला शांत झोप पाहिजे असेल तर रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. जर तुम्हाला ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबून काम करायचं असेल तर तिथेच हेल्दी डिनर करू शकता. त्यासाठी घरूनच जेवण घेऊन जा. जर तुम्ही लवकर जेवलात तर रात्री लवकर झोपू शकता. यामुळे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटतं. 

हृदयाचे आरोग्य बिघडतं

ज्या व्यक्ती रात्री उशिरा जेवतात. त्यांना हृदयाच्या समस्या होण्याचा धोका अधिक असतो. हृदय हेल्दी ठेवण्यासाठी आवश्यक आहे लवकर जेवण करणं. यामुळे जेवण व्यवस्थित पचण्यास मदत होते. फॅट आणि कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. 

वजन वाढू शकतं

ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे, अशा व्यक्ती जर रात्री उशिरा जेवत असतील तर त्यांचं वजन आणखी वाढतं. यामुळे शरीराच्या इतरही समस्या होऊ शकतात. जर तुम्हाला वजन कमी करण्याची इच्छा असेल तर रात्री उशिरा जेवण्याची सवय बदला. रात्री जवल्यानंतर थोडा वेळ वॉक नक्की करा. यामुळे जेवण व्यवस्थित पचण्यास मदत होते आणि शरीरामध्ये फॅट्स जमा होत नाहीत. 

छातीमध्ये जळजळ होणं

उशीरा जेवणं किंवा जेवल्यानंतर लगेच झोपणं या सवयींमुळे गॅसची समस्या वाढते. गॅसमुळ पोटात आणि छातीमध्ये जळजळ होते आणि अस्वस्थ वाटतं. यामुळे तुम्हाला शांत झोपही लागणार नाही. 

पोटाच्या समस्यांचा सामना करणं

ज्या व्यक्ती रात्री उशिरा जेवतात, त्यांना नेहमी पोटदुखी, अपचन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जेवलेलं अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे या सर्व समस्या उद्भवतात. पोटदुखी, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही रात्रीचं जेवण वेळेत करणं गरजेचं असतं. 

थकवा येणं

रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. कोणत्याही समस्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही 8 ते 9 वाजेपर्यंत जेवण करावं. वेळेवर झोपणं आणि जेवणं यांमुळे सकाळई उठल्यावर तुम्ही फ्रेश असाल. तसेच कामही तितक्याच उत्साहात कराल. 

पोट राहिल हलकं

जर तुम्ही वेळेवर जेवण करत असाल तर जेवण पचण्यास पूर्ण वेळ मिळतो. जेवल्यानंतर फिरायला गेल्याने जेवणं पचण्यास मदत होते आणि पोट हलकं राहतं. तसेच अॅसिडीटी आणि अपचन यांसारख्या समस्या होत नाहीत. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Effects of late night dinner on health change this habit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.