झटपट वजन कमी करायचे असेल तर अशाप्रकारे तयार करा कॉफी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 04:55 PM2018-07-17T16:55:39+5:302018-07-17T16:58:57+5:30

सकाळी उठल्यावर अनेकांना सर्वात आधी कॉफी पिण्याची सवय असते. काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या कॉफी घेतली नाही तर फ्रेशच वाट नाही. पण तम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आपलं वजन वाढविण्यासाठी बऱ्याचदा कॉफी कारणीभूत ठरते.

drink this type of coffee and green coffee for weight loss | झटपट वजन कमी करायचे असेल तर अशाप्रकारे तयार करा कॉफी!

झटपट वजन कमी करायचे असेल तर अशाप्रकारे तयार करा कॉफी!

googlenewsNext

सकाळी उठल्यावर अनेकांना सर्वात आधी कॉफी पिण्याची सवय असते. काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या कॉफी घेतली नाही तर फ्रेशच वाट नाही. पण तम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आपलं वजन वाढविण्यासाठी बऱ्याचदा कॉफी कारणीभूत ठरते. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, कॉफी प्यायल्याने वजन वाढते. परंतु तुम्ही कॉफीचे शौकीन असाल आणि वजनही आटोक्यात ठेवायचे असेल तर तुम्हाला कॉफी सोडायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारे कॉफी बनवून घ्यावी लागेल. आज आम्ही तुम्हाला कॉफी तयार करण्याची अशी पद्धत सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही कॉफीही पिऊ शकता आणि तुमचे वजनही नियंत्रित राहू शकते.

असा करा कॉफीचा उपयोग

कॉफी तयार करण्यासाठी सर्वात आधी पाव कप नारळाचे तेल आणि १ चमचा दालचिनी पावडर एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. आता त्यामध्ये एक चमचा कोको पावडर आणि अर्धा चमचा मध मिक्स करा. आणि तयार मिश्रण एका काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कॉफी तयार कराल त्यावेळी कॉफीमध्ये एक किंवा दोन चमचे हे मिश्रण मिक्स करा. काहीच दिवसंत तुम्हाला फरक दिसेल.

शरीरासाठी अत्यंत लाभदायक

अशाप्रकारे तयार करण्यात आलेली कॉफी वजन कमी करतेच, पण त्याचबरोबर वाढत्या वयाच्या खुणांनाही कमी करते. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही कमी वयातही म्हातारे दिसत असाल तर ही कॉफी तुमच्यासाठी लाभदायक आहे. कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टी-ऑक्सिडेंट असतात. त्यामुळे अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासही मदत होते. 

ग्रीन कॉफीचा वापर करा

नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, ग्रीन टी सारखीच ग्रीन कॉफी शरीरासाठी फायदेशीर असते. ग्रीन कॉफीबाबत संशोधकांनी सांगितले आहे की, सकाळी अनोशापोटी ग्रीन कॉफी घेतली तर अगदी सहज वजन कमी करण्यास मदत होते.

Web Title: drink this type of coffee and green coffee for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.