Do not you eat 'plastic' eggs? Identify the falsehood of truth! | ​आपण 'प्लास्टिक'ची अंडी तर खात नाही ना? खरी की खोटी, असे ओळखा !

-Ravindra More
कोलकाता, चेन्नई, डोंबिवलीपर्यंत प्रवास करणारी प्लास्टिकची अंडी आपल्या घरापर्यंत कधी पोहोचतील हे सांगता येत नाही. कारण हळुहळु ही प्लास्टिकची अंडी बाजारपेठेत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. अस्सल अंड्यासारखी दिसणारी ही प्लास्टिकची अंडी आपल्या पोटात गेल्यास आपल्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. मग आपण खात असलेली अंडी खरी कि खोटी ते कसं ओळखणार?
आज आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे प्लास्टिकची अंडी ओळखणे सोपे होईल. 

* प्लास्टिकच्या अंड्याच्या आतील पिवळा बलक तव्यावर टाकल्यास तो तसाच राहून पसरत नाही. साधारण अंड्याचा बलक तव्यावर लगेच पसरतो.

* अस्सल अंड्यांपेक्षा प्लास्टिकच्या अंड्यांच्या आतील पिवळा भागाचा रंग अधिक गडद असतो. प्लास्टिकची अंडी उकळल्यानंतर अंड्यांचा बाहेरचा भाग तोडल्यास कडक होतो.

* जिलेटीन, अ‍ॅल्युमिनियम, कॅल्शियम, सोडिअम एल्गिनाईटसारख्या रसायनांनी प्लास्टिक अंड्यांच्या आतला पिवळा भाग बनलेला असतो.

* प्लास्टिकच्या अंड्यांना आगीजवळ नेले असता वरचे कवच जाळू लागते तसेच जळताना प्लास्टिकचा वास येऊ लागतो.

गेल्या वर्षी चेन्नईत प्लास्टिकचे चीनी तांदूळ विकले गेल्याची घटना घडली होती. अशा बनावट गोष्टी दैनंदिन जीवनातील असल्याने याकडे फारसे कोणाचे लक्ष जात नाही पण नीट काळजी घेतल्यास आपले आरोग्य धोक्यात येणार नाही.
Web Title: Do not you eat 'plastic' eggs? Identify the falsehood of truth!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.