महिलांमध्ये डिप्रेशनमुळे वाढतो 'या' गंभीर आजारांचा धोका, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 11:41 AM2019-06-05T11:41:32+5:302019-06-05T11:47:03+5:30

डिप्रेशन ही अलिकडे वेगाने वाढणारी समस्या असून ही समस्या गंभीरतेने न घेतल्यास वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

Depression sufferers at risk of multiple chronic diseases | महिलांमध्ये डिप्रेशनमुळे वाढतो 'या' गंभीर आजारांचा धोका, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

महिलांमध्ये डिप्रेशनमुळे वाढतो 'या' गंभीर आजारांचा धोका, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

(Image Credit : PsyCom.net)

डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या गंभीर आजारांचा थेट संबंध डिप्रेशनशी आहे. एका ताज्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. या रिसर्चनुसार, ज्या महिलांमध्ये डिप्रेशनची लक्षणे असतात, त्यांना असे आजार आजार होण्याचा धोका अधिक असतो. या रिसर्चमध्ये महिलांमध्ये आजाराच्या आधी आणि नंतर डिप्रेशनची लक्षणे यावर अभ्यास करण्यात आला.

या रिसर्च टीमचे मुख्य Xiaolin Xu यांनी सांगितले की, 'अलिकडे अनेक महिला अनेक क्रोनिक(दीर्घकाळ राहणारा जुना आजार) आजारांनी पीडित आहेत. डायबिटीस, कॅन्सर, हृदयरोग आजकाल वेगाने वाढत आहेत. आम्ही यावर रिसर्च केला की, डिप्रेशनच्या लक्षणांआधी आणि नंतर हे आजार कसे विकसित होतात'.

या रिसर्चमध्ये सहभागी ४३.२ महिलांना सांगितले की, त्यांच्यात डिप्रेशनची लक्षणे होती. पण यातील केवळ अर्ध्याच महिलांना डिप्रेशन क्लिनिकली डायग्नोज झाला आणि त्यावर उपचार करण्यात आले. डिप्रेशनचे शिकार होण्याआधी या महिलांमध्ये क्रोनिक आजारांचा धोका १.८ टक्क्यांनी जास्त आढळला. डिप्रेशन दरम्यान सुद्धा महिलांमध्ये हे आजार सामान्य महिलांच्या तुलनेत २.४ टक्के जास्त रिक्स बघितली गेली.

(Image Credit : womenshealthmag.com)

या रिसर्चमधून हे आढळून आले की, डिप्रेशन आणि दीर्घकालीन आजारांचा समान जेनेटिक किंवा शारीरिक कारणांशी संबंध आहे. रिसर्चनुसार, शरीरात सूज, डिप्रेशन आणि आजार दोन्हींशी संबंध ठेवतं. डायबिटीस आणि हायपरटेंशनसारखे आजारही डिप्रेशनशी संबंधित आहेत.  

(Image Credit : Bridges to Recovery)

या रिसर्चमधून समोर आलेले परिणाम आता मानसिक आणि शारीरिक आजारांवर उपचारासाठी मदत करतील. या रिसर्चमधून ही बाब सुद्धा समोर आली की, ज्या महिलांमध्ये डिप्रेशन आणि आजार दोन्ही गोष्टी होत्या, त्या महिला कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील होत्या. तसेच त्या लठ्ठपणाच्या शिकार होत्या, तंबाखू आणि मद्यसेवन करत होत्या.

Web Title: Depression sufferers at risk of multiple chronic diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.