Delhi's still unaware of obesity | ​लठ्ठपणाविषयी दिल्लीकर अजुनही अनभिज्ञ

दिल्ली आणि आसपासच्या भागात एका आरोग्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार दारू, जंक फूड आणि आरोग्यास घातक जीवनशैलीमुळे देशाच्या राजधानीतील तरुणांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. विशेष म्हणजे या तरुणांना याची काहीच कल्पना नाही. त्याचे दूष्परिणाम तर सोडाच परंतु लठ्ठपणा, स्थुलत्व (ओबेसिटी) हे आजार असतात हे देखील त्यांना माहीत नाही.

आरोग्यविषयक असणारी ही अनभिज्ञता समोर आणणाऱ्या या सर्व्हेमध्ये दिल्ली व नजीकच्या भागातील २० ते ४५ वयोगटातील एक हजारपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. ८० टक्क्यांपेक्षा जास्त स्त्री-पुरुषांचा बॉडी-मास इंडेक्स (बीएमआय) २५ किग्रँ प्रति चौ. मीटरपेक्षा अधिक असूनही त्यांपैकी केवळ २१ टक्के लोकच स्वत:ला जाड किंवा लठ्ठ मानतात.

डॉ. प्रदीप चौबे यांनी सांगितले की, ‘आरोग्याविषयी तरुणांमध्ये असणारा हा निष्काळजीपणा खरोखरंच खूप धोकादायक आहे. लठ्ठपणामुळे आरोग्याला किती मोठी हानी पोहचू शकते याकडे त्यांचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. दिल्ली व एनसीआर भागातील तरुणांचा लठ्ठपणा आणि वजन घटविण्याच्या सर्जरीकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आला होता.

cnxoldfiles/चौ.मी असावा. त्यापेक्षा जास्त म्हणजे लठ्ठपणाची सुरूवात.
Web Title: Delhi's still unaware of obesity
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.