जगभरात चिंतेचा विषय ठरतोय कॅंडिडा ऑरिस, भारतात गेल्या ८ वर्षांपासून जातोय लोकांची जीव! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 10:27 AM2019-04-09T10:27:23+5:302019-04-09T10:30:04+5:30

वैद्यकीय विश्वात सतत काहीतरी गंभीर घटना होत असतात. सध्या असाच एक चिंतेचा विषय ठरतोय फंगस.

A dangerous fungus is spreading stealthily in the world, India facing candida auris fungus cases from past 8 years | जगभरात चिंतेचा विषय ठरतोय कॅंडिडा ऑरिस, भारतात गेल्या ८ वर्षांपासून जातोय लोकांची जीव! 

जगभरात चिंतेचा विषय ठरतोय कॅंडिडा ऑरिस, भारतात गेल्या ८ वर्षांपासून जातोय लोकांची जीव! 

Next

वैद्यकीय विश्वात सतत काहीतरी गंभीर घटना होत असतात. सध्या असाच एक चिंतेचा विषय ठरतोय फंगस. याची चिंता यासाठी वाढलीये कारण यावर कोणतही औषध काम करत नाही. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो आहे. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाच्या मृत्यूनंतरही हे फंगस जिवंत राहतात आणि आजूबाजूच्या गोष्टींमध्ये वाढतात. कॅंडिडा ऑरिस नावाचा हा व्हायरस एकीकडे जगभरात न सोडवलं जाणारं कोडं ठरत आहे तर दुसरीकडे भारतात या व्हायरसचे अनेक लोक बळी ठरत आहेत. 

न्यू यॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मे महिन्यात ब्रुकलिनच्या माउंट सिनाई हॉस्पिटल फॉर एब्डॉमिनल सर्जरीमध्ये एका वृद्ध व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. ब्लड टेस्ट केल्यावर समोर आले की, तो एका नव्या प्रकारच्या जीवाणुने संक्रमित आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना वेगळ्या रुममध्ये शिफ्ट केलं. त्यानंतर ९० दिवसांची त्यांना मृत्यू झाला. यूएसमध्ये कॅंडिडा ऑरिसचे साधारण ५८७ केसेस समोर आल्या आहेत.

१० पैकी दोन केसेस कॅंडिडा ऑरिसच्या..

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ग्लोबल थ्रेट करण्यात आलेल्या कॅंडिडा ऑरिसच्या केसेस भारतात २०११ पासून समोर येत आहेत. वेगवेगळ्या रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे. नुकत्याच एम्स ट्रॉमा सेंटरच्या डॉक्टरांकडून रुग्णांच्या प्रोफाइलवर करण्यात आलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली की, २०१२ ते २०१७ दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी १० केसेसपैकी दो केसेस कॅंडिडा ऑरिसच्या होत्या.

अ‍ॅंटीफंगल निकामी

कॅंडिडा ऑरिसने संक्रमित जास्तीत जास्त रुग्णांवर उपचारासाठी वापरलं जाणारं अ‍ॅंटीफंगल Fluconazole (55%) आणि Voriconazole (35%) चा काहीच प्रभाव झाला नाही. ही औषधे रुग्णाला तेव्हाच दिली जातात, जेव्हा त्यांच्यावर अ‍ॅंटीबॅक्टेरिअल औषधे काम करत नाहीत. कॅंडिडा ऑरिस एक असं फंगस आहे जे सामान्यपणे रुग्णालयाच्या वातावरणात राहतात आणि कमजोर रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांची शिकार करतात.  

३० दिवसात रुग्णांचा मृत्यू

२०११ मध्ये देशातील २७ मेडिकल आणि सर्जिकल आयसीयूमध्ये या फंगसबाबत मल्टी-सेंट्रिक ऑब्जर्वेशनल अभ्यास करण्यात आला होता. चंडीगढच्या द पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च याचं कॉर्डिनेटिंग सेंटर होतं. या अभ्यासाचा रिपोर्ट २०१४ मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. 

या रिपोर्टमधून समोर आलं होतं की, एप्रिल २०११ ते सप्टेंबर २०१२ दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ६.५१ टक्के कॅंडिडा ऑरिसने संक्रमित होते. याच्या इन्फेक्शनला केवळ २७.५ टक्के रुग्णांनाच ठिक केलं गेलं तर ४५ टक्के रुग्णांना वाचवण्यात अपयश आलं. त्यांचा ३० दिवसातच मृत्यू झाला. 

सूचना करण्यात आली जारी

फंगल इन्फेक्शन दोन प्रकारच्या फंगस ग्रुपमुळे होतं. एल्बिकॅंस (albicans) आणि नॉन-एल्बिकॅंस (non-albicans). एब्लिकॅंसवर अ‍ॅंटीफंगलचा प्रभाव होतो. पण चिंतेची बाब ही आहे की, कॅंडिडा ऑरिस नॉन-एल्बिकॅंस कॅटगरीत येतो, म्हणजे असा फंगस ज्यावर अ‍ॅंटीफंगल औषधांचा प्रभाव होत नाही. हेच कारण आहे की, या फंगसने संक्रमीत रुग्णांचा वाचण्याचा चान्स कमी असतो. 

द इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने २०१७ मध्ये सर्वच रुग्णालयांसाठी सूचना जारी केली होती. यात सांगण्यात आलं होतं की, कॅंडिडा ऑरिस नावाचा व्हायरसने मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा ३३ ते ७२ टक्के आहे. रुग्णालयांना सल्ला देण्यात आला की, जे रुग्ण या फंगसने संक्रमीत असतील त्यांना वेगळ्या रुममध्ये ठेवावे.

२० देशांमध्ये धोका

न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कॅंडिडा ऑरिस न्यू यॉर्क आणि इलिनोइसपर्यंत पोहोचला आहे. तसेच इतरही २० देशांमध्ये हा व्हायरस पोहोचला आहे. खरंतर या व्हायरसची ओळख पटवण्यासाठी खास लेबॉरेटरी पद्धतींची गरज असते. त्यामुळे असं होऊ शकतं की, आणखीही काही देशांमध्ये हा व्हायरसचं इन्फेक्शन पसरलं असेल पण ओळकलं गेलं नसेल. 

Web Title: A dangerous fungus is spreading stealthily in the world, India facing candida auris fungus cases from past 8 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.