गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने भावना होतील नष्ट, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 11:37 AM2019-02-12T11:37:32+5:302019-02-12T11:37:35+5:30

गर्भधारणा होऊ नये म्हणूण महिला गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करतात. या गोळ्यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणामही वेळोवेळी समोर आले आहेत.

Contraceptive pills can end emotions know new research facts | गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने भावना होतील नष्ट, जाणून घ्या कारण!

गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने भावना होतील नष्ट, जाणून घ्या कारण!

googlenewsNext

गर्भधारणा होऊ नये म्हणूण महिला गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करतात. या गोळ्यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणामही वेळोवेळी समोर आले आहेत. आता नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांच्या इमोशनल रिअ‍ॅक्शनवर प्रभाव पडतो. त्यांची चेहऱ्यावरील हावभाव ओळखण्याची क्षमता प्रभावित होत असल्याने त्यांचं लैंगिक जीवनही प्रभावित होत आहे.  

या रिसर्चमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करणाऱ्या महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते. महिलांना आनंद आणि भितीसारख्या भावनांऐवजी गर्व किंवा अपमानसाख्या कठीण भावनात्मक हावभाव ओळखण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. अशात अभ्यासकांना गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांमध्ये भावनात्मक ओळख करण्यात सूक्ष्म बदल आढळला. 

यातून ही समोर आली की, या गोळ्यांचा वापर न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत या गोळ्या वापरणाऱ्या महिलांमध्ये १० टक्के वाईट प्रभाव दिसला. अभ्यासकांनी सांगितले की, या अभ्यासात गर्भनिरोधक गोळ्यांच्या संभावित प्रभावावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. कारण याचा प्रभाव लैंगिक जीवन आणि सामाजिकतेवर पडू शकतो. 

अभ्यासकांनी त्यांच्या या शोधात सांगितले की, गर्भनिरोधक गोळ्यांसोबतच हार्मोन्सशी संबंधित गोळ्या पिंपल्स, मासिक पाळी किंवा एडोमेट्रिओसिसला कंट्रोल करण्यास फायदेशीर ठरू शकतात. तसेच गर्भनिरोधक गोळ्यांमुळे पचनक्रियेच्या कोलन कॅन्सरचा धोकाही कमी करतात. 

ग्रीफ्सवाल्ड विश्वविद्यालयाचे अलेक्झांडर लिश्चके यांच्यानुसार, 'जगभरात १० कोटी महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात, पण याने त्यांच्या भावना आणि व्यवहारावर पडणाऱ्या प्रभावाबाबत फार कमी माहिती उपलब्ध आहे. पण या रिसर्चमध्ये असे सांगण्यात आले आहे की, गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांमध्ये इतर भावनात्मक हावभाव ओळखण्याची क्षमता प्रभावित होते. 

Web Title: Contraceptive pills can end emotions know new research facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.