महागड्या परदेशी स्टेंटसारखीच चांगली आहे स्वदेशी स्टेंट - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 10:05 AM2018-11-16T10:05:12+5:302018-11-16T10:05:27+5:30

गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला भारतीय स्टेंटबाबतचा वाद आता संपला आहे. कारण भारतीय स्टेंट हे परदेशी स्टेंटसारखेच चांगल्या दर्जाचे आहेत, असे एका शोधातून सिद्ध झाले आहे.

Confirmed! Stents made in India are as good as the worlds best stent | महागड्या परदेशी स्टेंटसारखीच चांगली आहे स्वदेशी स्टेंट - रिसर्च

महागड्या परदेशी स्टेंटसारखीच चांगली आहे स्वदेशी स्टेंट - रिसर्च

Next

गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला भारतीय स्टेंटबाबतचा वाद आता संपला आहे. कारण भारतीय स्टेंट हे परदेशी स्टेंटसारखेच चांगल्या दर्जाचे आहेत, असे एका शोधातून सिद्ध झाले आहे. भारतात तयार होणाऱ्या स्टेंट्सची क्वॉलिटी याबाबत गेल्या काही वर्षांपासून वादविवाद सुरु होता. पण आता एका नव्या अभ्यासानुसार, हे स्पष्ट झाले आहे की, भारतात तयार होणारे स्टेंट्स जगातल्या सर्वात चांगल्या स्टेंट्सपैकी आहेत. साधारण १० वर्ष यावर अभ्यास करण्यात आल्यावर याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. या सांगण्यात आले आहे की, भारतीय स्टेंट्स यूकोन चॉइस पीसीची क्षमता ही स्टेंट मार्केटमध्ये सर्वात चांगल्या समजल्या जाणाऱ्या ऐबट या अमेरिकन कंपनीच्या xience स्टेंट इतकीच चांगली आहे. 

शिकागोमध्ये झालेल्या अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या सायन्स सेशनदरम्यान जर्मनीच्या कार्डिओलॉजिस्ट्सने २ हजार ६०३ रुग्णांवर केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगितले. यात रुग्णांवर उपचार २ जेनरेशन स्टेंटने केला गेला होता. एक होतं xience आणि दुसरं होतं यूकोन चॉइस. AHA नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या अभ्यासातून आढळलं की, या स्टेंटच्या परिणामांमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक बघायला मिळाला नाही.

फेब्रुवारी २०१७ मध्ये केंद्र सरकारने स्टेंटच्या किंमती नियंत्रित करण्याच्या उद्देशाने किंमती फिक्स केल्या होत्या. ज्यानंतर औषध सोडणाऱ्या स्टेंटची किंमत कमी झाली होती. त्यामुळे अनेक मल्टीनॅशनल कंपन्यानी भारतीय बाजारातून आपले स्टेंट परत घेण्याची धमकी दिली होती. त्यांचं म्हणनं होतं की, त्यांचे स्टेंट भारतीय स्टेंटपेक्षा अधिक चांगले आहेत. त्यामुळे त्यांची किंमत अधिक असायला हवी. अनेक कार्डिओलॉजिस्ट्सनी भारतात तयार केलेल्या स्टेंट्सच्या क्वॉलिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण आता नव्या शोधातून हे स्पष्ट झालं आहे की, भारतीय स्टेंटही परदेशी स्टेंटसारखेच चांगल्या दर्जाचे आहेत. यूकोन चॉइस स्टेंट भारतातच तयार केले जातात, पण जर्मन टेक्नॉलॉजीच्या मदतीने. तर भारतातीलच सुप्रा स्टेंट पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं आहे. 

काय आहे स्टेंट?

स्टेंट हे छोटे एक्सपेंडेबल ट्यूब आहे. जे शरीरात आकुंचन पावलेल्या किंवा कमजोर झालेल्या धमन्यांच्या उपचारासाठी वापरले जातात. कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) असलेल्या रुग्णांवर स्टेंटचा वापर आकुंचन पावलेल्या धमण्यांना मोकळे करण्यासाठी वापरले जातात. ज्यामुळे छातीत वेदना होणे कमी करण्यास मदत मिळते. तसेच हार्ट अटॅकचा उपचार करण्यासही मदत मिळते. स्टेंट हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. स्टेंटच्या किंमती सरकारने कमी केल्याने अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. कारण आधी याच्या किंमती फार जास्त असल्याने अनेकांना हा उपचार परवडत नव्हता. 

Web Title: Confirmed! Stents made in India are as good as the worlds best stent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.