ठळक मुद्देआहारात गरजेपेक्षा जास्त प्रोटिन्स असतील तर शरीरातील कोलेस्टोरॉलचं प्रमाण हळूहळू वाढायला लागतं.अनेकदा काहीही कारण नसताना वजन हळूहळू वाढायला लागतं. शरीरातील गरजेपेक्षा जास्त प्रोटिन्स हेदेखील त्याचं कारण असू शकतं.काही वेळा प्रोटिन्स जास्त झाल्यामुळे किडनीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.प्रोटिन्समुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी होऊ शकतं.

- मयूर पठाडे

तब्येतीकडे लक्ष द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? काय आणि किती काळजी घ्यायची? आणि मुळात आपल्याला ते समजायला तर हवं ना? आता अनेक जण सांगतात, प्रोटिन्स खा, आपल्या आहारात प्रोटिन्सचा समावेश करा.. पण ते किती खायचं? आपण सारंच ते अंदाजानं करतो. कुठे थांबावं ते आपल्याला कळतच नाही..
आता प्रोटिन्स खा, पण थांबायचं केव्हा.. प्रोटिन्सचा मारा जास्त होतोय हे आपल्याला कळणार कसं?..
-नक्की कळू शकतं आणि त्यावेळी आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं आणि प्रोटिन्सचा हा मारा थांबवायलाही हवा. नेमकी किती प्रोटिन्स आपल्याला आवश्यक आहेत, त्याचं साधारण प्रमाण आहारतज्ञाकडून समजावूनही घ्ययला हवं. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रोटिन्सची गरज वेगवेगळी असते. खरंतर प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, अत्यावश्यक फॅट्स साºयाच गोष्टींचं आपल्या शरीरात योग्य संतुलन असायला हवं.

प्रोटिन्स जास्त होताहेत हे कसं ओळखायचं?
१- तुमच्या आहारात जर गरजेपेक्षा जास्त प्रोटिन्स असतील तर तुमच्या शरीरातील कोलेस्टोरॉलचं प्रमाण हळूहळू वाढायला लागतं.
२- आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे काहीही कारण नसताना तुमचं वजन हळूहळू वाढायला लागतं. असं होत असेल तर गरजेपेक्षा जास्त प्रोटिन्स हेदेखील त्याचं कारण असू शकतं.
३- काही वेळा प्रोटिन्स जास्त झाल्यामुळे किडनीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
४- प्रोटिन्समुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी होऊ शकतं आणि तुमच्या शरीराला पाण्याची कमतरता जाणवू शकते आणि सातत्यानं तुम्ही डीहायड्रेटेड राहू शकता. त्यामुळे त्याचं कारण वेळीच तपासायला हवं.
५- काहीवेळा तुमच्या शरीराचं तापमानही नॉर्मलपेक्षा कमी होतं. शरीरातील प्रोटिन्स वाढल्याचं हे कारण असू शकतं.
त्यामुळे फक्त प्रोटिन्सच नव्हे, कार्बोहायड्रेट्स आणि अत्यावश्यक फॅट्सचं आपल्या शरीरातील प्रमाणही वेळोवेळी तपासून पाहा.