वजन कमी करण्यासाठी थंड लिंबू पाणीही ठरतं फायदेशीर; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 06:37 PM2019-03-14T18:37:55+5:302019-03-14T18:38:37+5:30

अनेजणांना बदललेली जीवनशैली आणि धकाधकीचा दैनंदिन दिनक्रम यांमुळे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. वाढलेल्या वजनामुळे अनेकजण वैतागलेले असतात.

Can drinking cold lemon water really help you lose weight | वजन कमी करण्यासाठी थंड लिंबू पाणीही ठरतं फायदेशीर; जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी थंड लिंबू पाणीही ठरतं फायदेशीर; जाणून घ्या

googlenewsNext

अनेजणांना बदललेली जीवनशैली आणि धकाधकीचा दैनंदिन दिनक्रम यांमुळे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. वाढलेल्या वजनामुळे अनेकजण वैतागलेले असतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ते अनेक प्रयत्न करतात. त्यामध्ये डाएटिंग, फास्टिंग, एक्सरसाइज, योगा यांसारख्या उपायांची मदत घेण्यात येते. वजन कमी करण्यासाठी अनेकदा हे सर्व उपायही निष्फळ ठरतात. कारण वजन कमी करणं अत्यंत अवघड काम आहे. जसं अनेक लोक वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करून त्याचं सेवन करतात. तसचं थंड पाण्यामध्ये लिंबू एकत्र करून प्यायल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. लिंबू पाण्याचे सेवन आपलं वाढणारं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. 

कॅलरी कमी होतात

थंड लिंबू पाण्यामध्ये कॅलरीचे प्रमाण फार कमी असते. पाण्यामध्ये अजिबात कॅलरी नसतात आणि लिंबामध्ये फक्त 17 कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रीयेदरम्यान थंड लिंबू पाणी प्यायल्याने फायदा होतो. 

मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी उपयोगी

लिंबू पाण्यामध्ये मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी मदत करतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. 

पोट बराच वेळापर्यंत भरल्यासारखं राहतं

लिंबू पाण्याचे सेवन तुम्हाला जास्त खाण्यापासून दूर ठेवतं. वजन कमी करण्यासाठी जेवताना किंवा काही खाताना मध्ये लिंबू पाणी पिणं भूक नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतं. कारण लिंबू पाण्यामध्ये कॅलरी फार कमी प्रमाणात असतात. 

शरीरातील टॉक्सिन्स नष्ट करतं

थंड लिंबू पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स नष्ट होण्यास मदत होते. तसेच शरीर क्लिंज होण्यासही मदत होते. ज्यामुळे अगदी सहज वजन कमी होण्यास मदत होते. 

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाण्याचे प्रमाण

ज्या लोकांचं वजन 68 किलो आहे, त्यांनी 8 ते 12 मिली थंड लिंबू पाणी प्यावं. त्याशिवाय ज्या लोकांचं वजन 68 किलोपेक्षा जास्त आहे. त्यांनी दररोज 2 वेळा लिंबू पाण्याचे सेवन करणं योग्य ठरेल. 

टिप : प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं. त्यामुळे एखादी गोष्ट किंवा पदार्थ सर्वांनाच सूट होइल असं नाही. म्हणून कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Can drinking cold lemon water really help you lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.