हृदय आणि मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे खास बटर कॉफी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 09:18 AM2018-10-18T09:18:51+5:302018-10-18T09:19:42+5:30

लोणी हे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. कॉफीमध्ये लोणी म्हणजेच बटर मिश्रित करुन सेवन केल्यास हृदय आणि मेंदूच्या आजारांचा धोका कमी होतो.

Butter coffee is beneficial for health and brain | हृदय आणि मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे खास बटर कॉफी!

हृदय आणि मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे खास बटर कॉफी!

googlenewsNext

लोणी हे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. कॉफीमध्ये लोणी म्हणजेच बटर मिश्रित करुन सेवन केल्यास हृदय आणि मेंदूच्या आजारांचा धोका कमी होतो. बटर कॉफीमुळे केवळ एनर्जीच नाही तर याने तुमचं फिटनेसही चांगलं राहतं. एका रिसर्चनुसार, जर तुम्ही ब्लॅक कॉफीचे चाहते असाल तर ही कॉफी ट्राय करणे तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकते. 

कशी बनवाल बटर कॉफी?

एक कप पाणी गरम करा. त्यात एक चमचा कॉफी पावडर टाका आणि उकळू द्या. त्यानंतर यात गायीचं किंवा म्हणीशं लोणी टाका. १ मिनिटे हे चांगलं मिश्रित करा. लोण्यामध्ये दुधातील सर्वप्रकारचे हेल्दी फॅट्स आहेत आणि हे क्रीमच्या तुलनेत अधिक फायदेशीरही आहे. लोण्याचा वापर केवळ ब्लॅक कॉफीमध्येच अधिक फायदेशीर आहे. 

एनर्जी वाढते

जेव्हा तुम्ही कॉफीमध्ये लोणी टाकता तेव्हा कॅंटोस तयार होतात. याने तुम्हाला एनर्जी मिळते. जेव्हा शरीर कार्बोहायड्रेटऐवजी फॅटची एनर्जी निर्मित करतात तेव्हा कॅंटोस शरीरात तयार होतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही कॉफी एक चांगला पर्याय ठरु शकते. ताजं लोणी हे आरोग्यासाठीही चांगलं आहे आणि फॅट कमी करण्यासाठीही मदत करतं.

हृदयासाठी फायदेशीर

लोणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच एनर्जी सुद्धा देतं. त्यामुळे हे हृदयासाठीही फायदेशीर आहे. लोणी जेव्हा कॉफीमध्ये मिश्रित केलं जातं तेव्हा यात व्हिटॅमिन के तयार होतं. जे हृदय रोगांपासून तुमचा बचाव करतं. जर तुम्हाला पोटाची समस्या असेल तर याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. कॉफीमध्ये लोणी मिश्रित करणेही फायदेशीर आहे.

मेंदुसाठी फायदेशीर

याचा आणखी एक फायदा म्हणजे या कॉफीने मेंदु योग्य प्रकारे काम करतो. याने तुमच्या मेंदुला हेल्दी फॅट मिळतात ज्याने शरीरात पेशी आणि हार्मोन तयार होतात जे आरोग्यासाठी चांगले असतात. ही कॉफी प्यायल्याने तुम्हाला अनेक तास भूकही लागत नाही. 

Web Title: Butter coffee is beneficial for health and brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.