World Breastfeeding Week : बाळासोबतच आईच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतं स्तनपान करणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 03:42 PM2018-08-06T15:42:29+5:302018-08-06T15:43:10+5:30

आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटल जातं की, बाळाला जन्म देताना आईचा पूर्नजन्म होतो. तसेच तिच्या शरीरातही अनेक बदल घडून येतात. बाळाला जन्म देणं ही निसर्गानं महिलांना दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे, असं समजलं जातं.

Breastfeeding is beneficial for Baby and her mother's health | World Breastfeeding Week : बाळासोबतच आईच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतं स्तनपान करणं!

World Breastfeeding Week : बाळासोबतच आईच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतं स्तनपान करणं!

googlenewsNext

आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटल जातं की, बाळाला जन्म देताना आईचा पूर्नजन्म होतो. तसेच तिच्या शरीरातही अनेक बदल घडून येतात. बाळाला जन्म देणं ही निसर्गानं महिलांना दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे, असं समजलं जातं. आई झाल्यावर त्या महिलेच्या जबाबदाऱ्याही वाढतात. त्या बाळाला सांभाळणं न्हाऊ-माखू घालणं यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आईला कराव्या लागतात. पण यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला दूध पाजणं. हा अनुभव महिलेसाठी अत्यंत सुखद असतो, पण एखाद्या कोपऱ्यात किंवा बंद दाराआडच महिलेन बाळाला दूध पाजावं असं म्हटलं जातं. या सर्वांचा विरोध करून जर महिलेनं बाळाला सर्वांच्या डोळ्यादेखत, उघड्यावर दूध पाजलं तर ती महिला चर्चेचा विषय बनते. अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. पण स्तनपान करणं हे बाळासोबतच आईसाठीही फायदेशीर असतं. जाणून घेऊयात स्तनपान करण्याचे बाळ आणि आईला होणारे फायदे...

बाळाला होणारे फायदे - 

- आईचं दूध बाळासाठी अमृतासमानच असतं. सहा महिने बाळाला इतर कशाचीही गरज नसते. जेवढं जास्त वेळ बाळाला आईचं दूध मिळतं तेवढाच वेगानं बाळाचा मानसिक आणि शारीरिक विकास होतो. 

- संशोधनानुसार, बाळाच्या विकासासाठी आणि पोषणासाठी ज्या तत्वांची आवश्यकता असते. ती सर्व तत्व आईच्या दूधामध्ये सामावलेली असतात. 

- आईच्या दूधामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीबॉडिज असतात. त्यामुळे बाळाचा इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो. 

- स्तनपान करण्याचे भावनात्मकही फायदे असतात, असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. कारण ज्यावेळी आई बाळाला दूध पाजते, त्यावेळी बाळ आईच्या सर्वात जवळ असतं. त्यामुळे ते भावनात्मक पद्धतीने एकमेकांशी जोडले गेलेले असतात. 

आईला होणारे फायदे -

- स्तनपान केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरी दूर होतात. त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहते.

- स्तनपानामुळे शरीरातील ऑक्सीटोक्सिन हार्मोनचा स्त्राव वाढतो. त्यामुळे गरोदरपणानंतर गर्भाशय आणि शरीराला पुन्हा त्याच अवस्थेत आणण्यास मदत होते.  

- स्तनपानामुळे आईला ब्रेस्ट कॅन्सर आणि अन्य अनेक आजार होण्याचा धोका कमी होतो.

Web Title: Breastfeeding is beneficial for Baby and her mother's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.