व्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 03:09 AM2018-11-15T03:09:46+5:302018-11-15T03:10:15+5:30

अमेरिकन जर्नलने घेतली दखल : भारतीय डॉक्टरांनी केले विकसित

Botox technology research to get ulcer | व्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध

व्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध

मुंबई : जखमेनंतर, आधी झालेल्या शस्त्रक्रियांमुळे किंवा भाजणे, अ‍ॅसिड अटॅक किंवा फेशिअल ट्रॉमामुळे चेहऱ्यावर व्रण येतात. चेहºयावरील व्रण रुंद असतील तर तो डाग राहतो आणि रुग्ण व शल्यविशारद हे दोघेही निराश होतात. चेहºयाच्या स्नायूंची सतत हालचाल होत असते. त्याचा जखम बरी होण्यावर आणि व्रण परिपक्व होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. याकरिता आता भारतीय डॉक्टरांनी नवे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. नव्या बोटॉक्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आता या जखमा आणि व्रण भरून काढणे सोपे होणार आहे़ या नव्या उपचारपद्धतीमुळे रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे.

प्लॅस्टिक सर्जन डॉ. देबराज शोम आणि त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी हे नवे तंत्र विकसित केले आहे. त्यांचे हे संशोधन अमेरिकन सोसायटी आॅफ प्लॅस्टिक सर्जनच्या प्लॅस्टिक अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. हे संशोधन चेहरा व मानेवरील १-७ इंच रुंदीचे व्रण असलेल्या जवळपास १०० रुग्णांवर करण्यात आले. या संशोधनाचा कालावधी ६ महिन्यांचा होता तर रुग्णांचा वयोगट १९-४७ होता. या संशोधनात ७६ टक्के रुग्णांमध्ये बºयापैकी सुधारणा दिसून आली. सहा महिन्यांच्या उपचारानंतर व्रण ८० टक्क्यांहून अधिक भरून निघाले.

डॉ. देबराज शोम म्हणाले, जखम भरून निघण्यासाठी किंवा व्रण बुजविण्यासाठी विशेषत: आशियाई भारतीय, आफ्रिकन आणि हिस्पॅनिक मूळ असलेल्यांसाठी गेल्या तीन दशकांमध्ये अत्यंत कमी तंत्रांचा शोध लावण्यात आला आहे. हे पाहता या संशोधनाला महत्त्व आहे. व्रण बरे करण्यासाठी बोटॉक्सचा वापर केला आहे. त्या पद्धतीने आजपर्यंत कुणीही वापर केला नव्हता.
केलॉइड्ससाठी बोटॉक्सचा वापर करण्यात आला आहे; पण व्रण बरे करण्यासाठी, व्रण रुंद होण्याला प्रतिबंध करण्यासाठी आणि जखम भरून निघण्यासाठी त्याचा वापर केल्याचा कोणताही दाखला मिळत नाही. ज्यांच्या शरीरातील मेलॅनिनच्या (गडद त्वचेचे पिगमेंट) अस्तित्वाचा परिणाम व्रण भरून निघण्यावर होत असतो त्यांच्या शरीरावरील कुठलेही व्रण किंवा जखमा आता भरून निघू शकतात.

अशी आहे उपचारपद्धती
उपचार पद्धतीमध्ये सर्वप्रथम व्रणाभोवती दोन बोटॉक्स इंजक्शन्स देण्यात येतात. त्यानंतर दोन आठवड्यांनी पुनर्शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर पुढील ६ महिने सेंटेनेला एशियाटिका (भारतीय उपखंडात सापडणारी वनौषधी) त्या व्रणावर लावण्यात येते आणि कार्बन डायआॅक्साइड लेझर स्कीन रिसरफसिंगची अनेक सत्रे घेण्यात येतात.

परिणामी व्रण रुंद होतात, अस्पष्ट दिसू लागतात. चेहºयावरील स्नायूंना तात्पुरते बधिर करून तेथील स्नायूंमुळे जखमांवर येणारा ताण टाळणे ही या तंत्रामागची मूलभूत संकल्पना आहे. ही व्रण उपचारपद्धती भारतीय आणि पिगमेंटेड स्कीन असलेल्या व्रणांवरील उपचारांमध्ये आमूलाग्र बदल घडवेल़

Web Title: Botox technology research to get ulcer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.