हृदयरोगांपासून बचावासाठी कोलेस्ट्रॉल करा कमी, जाणून घ्या सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 10:01 AM2019-07-23T10:01:31+5:302019-07-23T10:11:17+5:30

शरीरात अधिक कोलेस्ट्रॉल झाल्याने आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका होतो.

Ayurvedic methods to lower cholesterol level | हृदयरोगांपासून बचावासाठी कोलेस्ट्रॉल करा कमी, जाणून घ्या सोपे उपाय!

हृदयरोगांपासून बचावासाठी कोलेस्ट्रॉल करा कमी, जाणून घ्या सोपे उपाय!

googlenewsNext

(Image Credit : Brett Elliott)

शरीरात अधिक कोलेस्ट्रॉल झाल्याने आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका होतो. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यावर भर देणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉल स्तर वाढल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्ट अटॅक आणि हृदयाचे इतर आजार.

जेव्हा आपल्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, आपलं शरीर काही संकेत देतं. हे संकेत समजून घेऊन वेळीच ब्लड टेस्ट करावी आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून सुटका मिळवावी. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी ठेवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

(Image Credit : myhealthroom.blogspot.com)

१) तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की हृदयासाठी लसूण चांगला असतो. ते खरंच आहे. लसूण हृदयासाठी चांगला असतो. कच्चा लसूण खाल्याने अधिक फायदा होतो. लसणाची एक कळी, आल्याचा एक तुकडा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण रोज जेवणाआधी खाल्ल्याने जास्त फायदा होईल.

२) दालचीनीचा वापर करूनही तुम्ही कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण कमी करू शकता. एक चमचा दालचीनी आणि हर्बल त्रिकुटचा( काळे मिरे, लवंग आणि सूंठाचं चूर्ण) एक चतुर्थांश भाग टाकून चहा करा. चहा तयार केल्यावर १० मिनिटे थंड होऊ द्या. नंतर यात एक चमचा मध मिश्रित करून दोनदा सेवन करा.

३) नियमितपणे रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होता. सोबतच कोलेस्ट्रॉलही कमी केला जातो. आवळ्याचा शरीरावर अ‍ॅंटी-हायपरलिपिडेमिक, अ‍ॅंटी-एथेरोजेनिक आणि हायरोलिपिडेमिक प्रभाव होतात. हे शरीरासाठी हायपोलिपिडेमिक एजंटसारखं काम करतात आणि याने सीरममधील लिपिडचं प्रमाणही कमी केलं जातं.

(Image Credit : Dabur)

४) दररोज रिकाम्या पोटी कोमट पाण्याने मध टाकून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होता. त्यातील महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी होण्यासोबतच कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कंट्रोलमध्ये राहतं. याने शरीरातील चरबी कमी करून खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित करण्यात मदत मिळते. यात तुम्हाला हवं असेल तर एक चमचा लिंबाचा रस किंवा अ‍ॅपल व्हिनेगरची दहा थेंबही टाकूनही सेवन करू शकता.

(Image Credit : Livemint)

५) शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी आहारात बाजरी, दलिया, गहू, सफरचंद, द्राक्ष आणि बदामचा समावेश करा. बदाम शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवण्यास मदत करतं.

(Image Credit : The Independent)

६) कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी केवळ आहारात बदल करूनच फायदा नाही तर एक्सरसाइजची तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे रोज वेळ काढून एक्सरसाइज करावी. चांगला आहार आणि एक्सरसाइज या दोन गोष्टींच्या मदतीने तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवू शकता.

Web Title: Ayurvedic methods to lower cholesterol level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.