तुम्ही मुलांपेक्षा 'या' गोष्टींना जास्त प्राधान्य देता का?; होऊ शकतं 'हे' नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 11:43 AM2019-03-21T11:43:52+5:302019-03-21T11:44:41+5:30

सध्याचं युग तंत्रज्ञानाचं युग आहे, परंतु, आता मुलांनाही ओरडणाऱ्या पालकांच्या हातातही सर्रास मोबाईल दिसून येतात. एवढचं नाही बरं का? एकमेकांच्या संपर्कात राहण्यासोबतच जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्वच कामांसाठी मोबाईलचा वापर करण्यात येतो.

Are you giving more attention than children to these things priority may be loss | तुम्ही मुलांपेक्षा 'या' गोष्टींना जास्त प्राधान्य देता का?; होऊ शकतं 'हे' नुकसान!

तुम्ही मुलांपेक्षा 'या' गोष्टींना जास्त प्राधान्य देता का?; होऊ शकतं 'हे' नुकसान!

googlenewsNext

(Image Credit : Lifehack)

सध्याचं युग तंत्रज्ञानाचं युग आहे, परंतु, आता मुलांनाही ओरडणाऱ्या पालकांच्या हातातही सर्रास मोबाईल दिसून येतात. एवढचं नाही बरं का? एकमेकांच्या संपर्कात राहण्यासोबतच जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्वच कामांसाठी मोबाईलचा वापर करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का?, हे मोबाईलचं वेड तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर घेऊन जात आहेत. ज्यामुळे फक्त कुटुंबामध्येच तणाव होत नाही तर तुमची लहान मुलंही डिप्रेशनची शिकार होत आहेत. 

मोबाईल बनलाय तिसरं काम

खरं तर आपल्या सर्वांची गरज बनलेला मोबाईल आपलं तिसरं काम झाला आहे. लोकांना आपल्या दिवसभराच्या कामासोबतच आपला मोबाईलही तितकाच महत्त्वाचा वाटू लागला आहे. सर्वात आधी ते ऑफिस आणि मित्रांसोबत बीझी असतात, पण आता ते मोबाईल म्हणजेच सोशल मीडियामध्ये बीझी दिसतात. ज्यामुळे घर आणि कुटुंब हे जबाबदारीच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर गेलं आहे. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, भारतासोबतच इतर 11 विकसनशील देशांमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून हा खुलासा करण्यात आला आहे. संशोधनामध्ये समाविष्ट झालेल्या 90 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे त्यांना फायदा होत आहे.

घाबरवणारे आकडे

पियू रिसर्च सेंटरने केलेल्या संशोधनानुसार, या देशांमध्ये सरासरी 64 टक्के लोकं सोशल मीडियाशी निगडीत असणाऱ्या मेसेजिंग अॅपचा उपयोग करतात. तेच 53 टक्के लोक इंटरनेट आणि अॅप नसलेल्या स्मार्टफोनचा उपयोग करतात. या सर्वेमध्ये भारत, कोलंबिया, वेनेजुएला, मॅक्सिको, दक्षिण आफ्रिका, केन्या, व्हिएतनाम, फिलिपिन्स, जॉर्डन, लेबनान आणि ट्यूनिशियाच्या लोकांना सहभागी करण्यात आलं होतं. संशोधनामध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी 64 टक्के फेसबुक आणि 47 टक्के व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात.  
 
मुलांमध्ये वाढतं डिप्रेशन

संशोधनानुसार, जेव्हा संशोधनामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर करण्याचा त्यांच्या मुलांवर वाईट परिणाम होत आहे असे विचारल्यावर अनेकांची उत्तरं सारखीच असल्याचे दिसून आले. 79 टक्के लोकांनी सांगितले की, मुलांना स्मार्टफोन देत असाल तर त्यांच्यावर वाईट परिणाम करणारी वस्तू तुम्हीच त्यांच्या हातात देत आहात. त्याचबरोबर असंही सांगितलं की, मुलांवर याचा वाईट परिणाम दिसत आहे. तेच इतर लोकांचं म्हणणं आहे की, त्यांच्या देशामध्ये मुलांवर मोबाईलचा वाईट परिणाम होतो.

मुलांवर होतात वाईट परिणाम

संशोधनामध्ये सहभागी झालेल्या लोकांचं म्हणणं आहे की, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा त्यांना अनेक प्रकारे फायदा मिळतो. दरम्यान, मुलांवर होणाऱ्या नकारात्मक परिणामाबाबत चिंता वाढू लागली आहे. पियूचे निर्देशक रॅनी यांचं म्हणणं आहे की, स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे फायदा होत असला तरी लोकांना याबाबतही लक्ष देणं गरजेचं आहे की, याचा समाज आणि मुलांवर कसा परिणाम होत आहे. 

Web Title: Are you giving more attention than children to these things priority may be loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.