Anti mosquito drug ivermectin can reduces malaria cases in children says a study | लहान मुलांना मलेरियापासून दूर ठेवण्यासाठी 'आयवरमेक्टिन ड्रग' फायदेशीर - रिसर्च
लहान मुलांना मलेरियापासून दूर ठेवण्यासाठी 'आयवरमेक्टिन ड्रग' फायदेशीर - रिसर्च

मलेरियासारखा आजार तसं पाहायला गेला तर गंभीर आजार आहे. परंतु हा आजार लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरतो. खासकरून 5 ते 6 वर्षांच्या लहान मुलांसाठी हा घातक सिद्ध होऊ शकतो. परंतु. एक असं औषध किंवा ड्रग आहे, ज्याच्या मदतीने मुलांमध्ये दिसून येणाऱ्या मलेरियाच्या लक्षणांना 20 टक्क्यांपर्यंत कमी केलं जाऊ शकतं. काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे. 

मलेरियावर परिणामकारक ठरणाऱ्या या औषधाचं नाव आहे आयवरमेक्टिन. चाचणीमध्ये असं आढळून आलं की, जर आयवरमेक्टिन ड्रग (ivermectin) मलेरियाच्या साथीदरम्यान दर तीन आठवड्यांनी एकदा बॉडीमध्ये इंजेक्ट केलं, तर यामुळे पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना होणारा मलेरियासारखा आजार रोखणं शक्य होतं. 

द लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या तपासणी अहवालामध्ये कोलराडो स्टेट यूनिवर्सिटीचे संशोधक ब्रायनडी फॉय यांनी सांगितले की, आयवरमेक्टिन औषध शरीरातील मलेरियाचे विषाणू वाढू देत नाही आणि या औषधामुळे मानवाच्या शरीरामधील रक्तामध्ये काही अशी तत्व तयार होतात. जी माणसांसाठी घातक नसतात पण डासांसाठी घातक असतात. यामुळे इतर लोकांना या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. 

साधारणतः आयवरमेक्टिनचा वापर रिवर ब्लाइंडनेसपासून स्केबीज म्हणजे त्वचेचं संक्रमण, खाज यांमुळे होणाऱ्या पॅरासाइट इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी केला जातो. ब्रायन यांनी पुढे बोलताना सांगितले की, मलेरियाला आळा घालणारे इतर अॅन्टीमलेरियल ड्रग्स आणि किटकनाशकांच्या तुलनेमध्ये आयवरमेक्टिन जास्त प्रभावशाली पद्धतीने काम करतं. याच वैशिष्ट्यामुळे याला इतर औषधांमसोबत आजारासोबतची सर्व लक्षणं दूर करण्यासाठी वापरण्यात येतं. 

या संशोधनासाठी संशोधकांच्या टिमने 18 आठवड्यांच्या परिक्षणादरम्यान मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी मास आयवरमेक्टिनची प्रक्रिया पुन्हा करण्यात आली. संशोधनामध्ये 2700 लोकांना सहभागी करण्यात आले. ज्यामध्ये पश्चिमी आफ्रिकेच्या बुर्किना फासोंच्या 590 मुलांना सहभागी करण्यात आलं होतं. 2000 नंतर वैश्विक स्तरावर मलेरियामुळे होणारे मृत्यू 48 टक्क्यांनी कमी झाले होते. 

कसा होतो मलेरिया?

'मलेरिया' हा आजार एका विषाणूच्या संक्रमणाने होत असून तो अॅनॉफिलिस जातीचा डास चावल्याने होत असून प्लाझमोडियम वायवॅक्स या विषाणूंमुळे हा रोग होतो. मानवाच्या शरीरात विषाणू प्रवेश करून पोटात जातात व आपली संख्या वाढवितात. 

'मलेरिया'चे चार प्रकार :

  • प्लासमोडियम फेल्सीपेरम. 
  • प्लासमोडियम वाइवॅक्स. 
  • प्लासमोडियम मलेरिया. 
  • प्लासमोडियम ओवेल. 

 

मलेरियाची लक्षणं :

ताप, डोकेदुखी, उलटी इत्यादी लक्षणं डास चावल्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्ये व्यक्तीला जाणवतात. वेळीच उपचार केला नाही तर अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण मलरिया झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील महत्त्वपूर्ण भागांना रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळेतच उपचार करावा.


Web Title: Anti mosquito drug ivermectin can reduces malaria cases in children says a study
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.