अमेरिकेत ट्रान्सजेंडर पुरूषाने बाळाला दिला जन्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 10:28 AM2019-03-09T10:28:24+5:302019-03-09T10:29:50+5:30

अमेरिकेतील वायली सिम्पसनने त्यांचं बाळ सहा महिन्यांचं झाल्यावर याबाबतचे अनुभन शेअर केलेत.

American transgender man gives birth to baby boy | अमेरिकेत ट्रान्सजेंडर पुरूषाने बाळाला दिला जन्म!

अमेरिकेत ट्रान्सजेंडर पुरूषाने बाळाला दिला जन्म!

googlenewsNext

(Image credit: Caters News Agency)

अमेरिकेतील एका ट्रान्सजेंडर पुरूषाने बाळाला जन्म दिली आहे. मात्र स्त्रीची पुरूष होण्याच्या प्रक्रियेदरम्यान गर्भधारणा आणि नंतर बाळाला जन्म देणं त्यांच्यासाठी फार त्रासदायक ठरलं. अमेरिकेतील वायली सिम्पसनने त्यांचं बाळ सहा महिन्यांचं झाल्यावर याबाबतचे अनुभन शेअर केलेत.

२८ वर्षीय वायली सिम्पसन अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात पार्टनर स्टीवन गॅथसोबत राहतात. २१ वर्षांची असताना त्यांनी पूरूष होण्याची शारीरिक प्रक्रिया सुरू केली होती. यादरम्यान त्यांना पीरियड्स येणे बंद झाले होते. आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते की, ते गर्भधारणा करू शकणार नाहीत. मात्र फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांना माहिती मिळाली की, टेस्टोस्टेरॉन थेरपीनंतरही त्यांची गर्भधारणा झाली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. 

वायली यांनी आता सर्जरीच्या माध्यमातून स्तनही शरीरापासून वेगळे केले आहेत. यानंतर त्यांना धक्काही बसला आणि ते नर्व्हसही झाले. पण त्यांना बाळाला जन्म देण्याचा निर्णय कायम ठेवला. पण या कपलसाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्यांना त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या वाईट वागण्याचा सामना करावा लागला. 

सप्टेंबर २०१८ ला वायली यांनी सिजेरियनच्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला. या मुलाचं नाव त्यांनी रोवन ठेवलं आहे. हा मुलगा सहा महिन्यांचा झाल्यावर या प्रवासाचे अनुभव त्यांनी जगासमोर आणले. वायली सांगतात की, 'गर्भवती पुरूषाला पहिल्यांदाच कुणी पाहिलं असेल. जेव्हाही मी रस्त्याने जात होतो, तेव्हा लोक मला म्हणायचे की, मी कधीच पुरूष होऊ शकणार नाही. कारण पुरूष कधी बाळांना जन्म देत नाहीत'.

आपल्या बाळा पाहिल्यावर वायली सांगतात की, माझ्या बाळाच्या आनंदासमोर सर्व त्रास, अडचणी आणि वाईट वागणं काहीही नाहीये. आता दोघांनीही ठरवलं आहे की, भविष्यात ते आता बाळ होऊ देणार नाहीत.

Web Title: American transgender man gives birth to baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.